* जे. एम. म्हात्रे निर्णय घेणार : राहुल गांधी यांच्या दबावामुळे जातीय जनगणना - सुदाम पाटील
पनवेल / साबीर शेख :- उरण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा धर्म म्हणून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मनोहर भोईर यांचा प्रचार केला. वास्तविक उरणमध्ये प्रितम म्हात्रे उमेदवार नसते तर रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली नसती त्यामुळे स्वत: प्रितम म्हात्रे यांनी जाणूनबुजून उमेदवारी घेऊन महाविकास आघाडीत बिघाडी करून भाजपाची सुपारी घेतले होती की काय ? अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे, तरी कॉंग्रेस पक्षाने आपला आघाडी धर्म प्रामाणिकपणे पाळला आहे. त्यामुळे कॉंग्रेसने काम केले नाही असे सांगणे म्हणजे हे चोराच्या उलट्या बोंबा होत, असे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी सांगितले.
पनवेल कॉंग्रेस पक्षातर्फे रविवारी 4 मे रोजी कॉंग्रेस भवन येथे तातडीची बैठक झाली. बैठकित संघटनात्मक वाढीबाबत चर्चा, संविधान रॅली, सद्भावना रॅली तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. भारतीय जनतेला समज झाला आहे की, भाजपा सरकार नियमित जनगणना 2021 ला संपायला हवी होती ती सुरूच केली नाही म्हणून कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या दबावामुळे जाती जनगणनेबाबत केंद्राला धारेवर धरून त्यांनी जाती जनगणना करण्यास भाग पाडले, त्याबद्दल राहुल गांधी यांचा आभाराचा ठराव पास केला. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणूक 2024 मध्ये अधिकृत पनवेल विधानसभा शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा प्रचार केला. प्रदेश कॉंग्रेसकडून आदेश आलेला नसताना देखील प्रामणिकपणे शेकापसोबत निस्वार्थी आणि ठामपणे उभे राहिलो, त्यावेळी कॉंग्रेस पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांचा पक्षादेश न पाळल्यामुळे पक्ष शिस्तभंगाची कारवाई झाली असती परिणामी आम्ही कोणतीही पर्वा न करता शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांचे काम केले तसेच उरण विधानसभेत प्रितम म्हात्रे यांची उमेदवारी म्हणजे जे. एम म्हात्रे यांनी भाजपकडून रचलेला कट की काय असा प्रश्न निर्माण होतो असे त्यांनी सांगितले.
या बैठकीमध्ये कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, प्रदेश उपाध्यक्ष कॅप्टन कलावत, प्रदेश सचिव विजय चव्हाण, चंद्रकला नायडू, महिला जिल्हाध्यक्षा निर्मला म्हात्रे, जिल्हा युवक अध्यक्ष, हेमराज म्हात्रे, माजी सभापती वसंत काठावले, पनवेल अध्यक्ष लतीफ शेख, सुरेश पाटील, अरुण कुंभार, सुधीर मोरे, मनोज बिरादार, अरविंद सोनटक्के, जोस जेम्स, भारती जळगावकर, आरती ठाकूर, अमित दवे, नीता शेनोय, राकेश जाधव, आर. यु. सिंग, शौकत खान, मुनावर देशमुख, आदम ढलाईत, शाहीद मुल्ला व आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
जे. एम. म्हात्रे यांनी मी शेकाप चिटणीस पक्ष प्रमुख जयंत पाटील यांचा अपमान कधीही पाहू शकत नाही . विवेक पाटील यांचे नाव न घेता मी जेरबंद वाघाला कधीच पाहायला जाऊ शकत नाही म्हणून पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत जो निर्णय होईल ते एकमताने घेवू पण महाविकास आघाडीत राहणार नाही यावर आपली भूमिका स्पष्ट केली.

Post a Comment
0 Comments