Type Here to Get Search Results !

सन १९७८ ते १९९१ च्या शासन निर्णयाप्रमाणे शासकीय जमिनीला नियमानुकूल करा !

* महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आरपीआय (आठवले) पक्षाची मागणी

* त्वरित नोंद घ्यावी व सुनावली अंतिम करण्याचे महसूल मंत्री यांचे आदेश 

मुंबई / प्रतिनिधी :- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) श्रमिक ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश सचिव तुषार तानाजी कांबळे यांनी नुकतीच महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली व सन १९७८ ते १९९१ च्या शासन निर्णयाप्रमाणे शासकीय जमिनीला नियमानुकूल करा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 


सातारा, पुणे, बुलढाणा, रायगडासह असे जिल्ह्यात महसूलशी निगडीत अनेक प्रकरणे समोर आली आहेत. काही प्रकरणाचा निपटारा करीत असताना अनेक गोष्टी समोर आल्यावर तुषार तानाजी कांबळे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लेखी पत्र देत या गोष्टींवर निर्णय घेण्याचे आवाहन केले. सन १९७८ ते १९९१ च्या शासन निर्णयाप्रमाणे शासकीय जमिनीला नियमानुकूल करा, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, तुषार कांबळे यांच्याशी चर्चा केल्यानंतर महसूल मंत्री बावनकुळे यांनी सातारा जिल्हाधिकारी, पुणे जिल्हाधिकारी, बुलढाणा जिल्हाधिकारी यांना काही सामाजिक विषयावरती चर्चा केली व तसे आदेश दिले. त्वरित नोंद घ्यावी व सुनावली अंतिम करण्याचे आदेश महसूल मंत्री यांनी दिले. 


निवेदन देतांना आरपीआय नेते तुषार कांबळे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ता तथा युवा उद्योजक अपर्णा म्हेत्रे, स्वप्निल चव्हाण, सुरज मोरे (सोशल मीडिया इन्फ्लेरस - नवीन योजना यूट्यूब चैनल) व आरपीआय पदाधिकारी,  कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments