* स्वच्छ भारत मिशन ग्रामीण सेग्रीगेशन शेड बांधकाम पाहणी
मुंढर (कोकण) / प्रतिनिधी :- राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाद्वारे विविध ग्रामविकास योजना राबविण्यात येतात, त्या अंतर्गत मुंढर ग्रामपंचायत कातकिरी येथे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन सेग्रीगेशन शेड बांधकामाची पाहणी तसेच स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत कंपोस्ट खड्डा भरू आपले गाव स्वच्छ ठेवू या अभियानाचा शुभारंभ ग्रामपंचायत मुंढर कातकिरी येथे गुहागर पंचायत समिती गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी केले.
या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपंचायत गुहागर स्वप्निल चव्हाण, माजी कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, सरपंचा अमिषा गमरे, ग्रामपंचायत सदस्या प्रणिता रामाने, ग्रामपंचायत अधिकारी सुरेश गोरे, स्वच्छ भारत मिशनचे सर्वेश साळवी, माजी उपसरपंच अजित गमरे, मुख्याध्यापक दशरथ कदम, उपशिक्षक पवार सर तसेच सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ, विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments