* आमदार प्रशांत ठाकूर यांनी पोलिस ठाण्यात केली तक्रार
* ठाकूर यांच्या नावाचा गैरवापर करून पैसे मागण्याचा प्रकार
पनवेल / साबीर शेख :- पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नावाने अज्ञात व्यक्तींकडून अनेकांना फोन करून पैशांची मागणी करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी तातडीने पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांचे नाव वापरून काही अज्ञात व्यक्ती इतर व्यक्तींना फोन करून पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. दूरध्वनी करणारे व्यक्ती पंजाबी भाषेत बोलत होते आणि आमदार ठाकूर यांच्या नावाचा गैरवापर करून पैसे मागत होते. ज्या नागरिकांना संशय आला, त्यांनी या व्यक्तींना जाब विचारताच त्यांनी फोन बंद केला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार ठाकूर यांनी तातडीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, 3 मे रोजी मला माझ्या नावाने पैशांची मागणी करणारे फोन आल्याची माहिती मिळाली. फोन करणारे पंजाबी भाषेत बोलत होते आणि माझ्या नावाने पैसे मागत होते. दूरध्वनी आलेल्या व्यक्तीने शंका व्यक्त करताच त्यांनी फोन बंद केला. त्यामुळे सावधगिरी म्हणून मी पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. माझ्या नावाने इतर कोणाला फोन आल्यास मला कळवा किंवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments