Type Here to Get Search Results !

नगरदेवळा येथे जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धा उत्साहात संपन्न

* 14, 17 आणि 19 वर्षे वयोगटातील शेकडो खेळाडूंचा सहभाग ; विजेत्यांचा सत्कार करून क्रीडा संस्कृतीला बळ

नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- नगरदेवळा येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव आणि ग्राम शिक्षण समिती संचलित सरदार एस. के. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 14, 17 आणि 19 वर्षे मुलांच्या जिल्हास्तरीय आट्यापाट्या क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धांना जिल्ह्यातील विविध शाळांमधील संघांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

* दिमाखदार उद्घाटन सोहळा :- स्पर्धेचे उद्घाटन ग्राम शिक्षण समितीचे मानद चिटणीस शिवनारायण जाधव, व्हा. चेअरमन सुभाष थेपडे, राज्य क्रीडा मार्गदर्शक चंचल माळी, ग. स. सोसायटीचे संचालक अजय देशमुख, तालुका समन्वयक गिरीश पाटील तसेच महाराष्ट्र आट्यापाट्या संघटनेचे कार्यकारिणी सदस्य अनिल माकडे यांच्या हस्ते संपन्न झाले.


यावेळी ग्राम शिक्षण समितीचे संचालक किशोर पाटील, जगन्नाथ पाटील, वामन पाटील, अब्दुल गनी शेठ तसेच शिवकन्या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अभिलाषा रोकडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


* शाळेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग :- कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य किरण काटकर यांनी केले. यावेळी उपप्राचार्य व्ही. बी. गहरवाल, एस. पी. बावस्कर, जी. यू. पवार, क्रीडा प्रमुख प्रा. प्रशांत शिरुडे, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक डी. पी. राजपूत, एस. आर. महाजन, जाधव मॅडम, वकार शेख तसेच बाहेरगावाहून आलेले क्रीडा शिक्षक उपस्थित होते.


स्पर्धा सुरळीत पार पडण्यासाठी जिल्हा आट्यापाट्या संघटनेतील देवेश पाटील, रोहित नवले, दीपेश पाटील, प्रणव बडे, सचिन बंगाळे, भूपेंद्र भारंबे, सोनल पाटील, साई वाणी, विवेक पाटील, महेश पाटील, साहिल बिडकर, रवींद्र जाधव यांनी पंच म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.


* 14, 17 आणि 19 वर्षे वयोगट - अंतिम निकाल :-

- 14 वर्षे वयोगट (मुले)  प्रथम - झि. तो. महाजन विद्यालय, धानोरा (चोपडा), द्वितीय - सरदार एस. के. पवार विद्यालय, नगरदेवळा, तृतीय - बारी समाज माध्यमिक विद्यालय, शिरसोली (जळगाव).

- 17 वर्षे वयोगट (मुले) प्रथम - बियाणी पब्लिक स्कूल, भुसावळ, द्वितीय - झि. तो. महाजन विद्यालय, धानोरा (चोपडा), तृतीय - कुरवेल हायस्कूल, कुरवेल (चोपडा).

19 वर्षे वयोगट (मुले)  प्रथम - सरदार एस. के. पवार विद्यालय (नगरदेवळा), द्वितीय - झि. तो. महाजन विद्यालय, धानोरा (चोपडा), तृतीय - बारी समाज माध्यमिक विद्यालय, शिरसोली (जळगाव).


* शिवकन्या बहुउद्देशीय संस्थेकडून सन्मान :- जिल्हास्तरीय विजेत्या संघांना शिवकन्या बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अभिलाषा रोकडे यांनी सन्मानचिन्ह देऊन गौरविले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी. यू. पवार यांनी अत्यंत सुंदरपणे केले, तर आभार प्रा. पी. आर. शिरुडे यांनी मानले. खेळाडू, शिक्षक, पंच व उपस्थित नागरिकांनी विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.



Post a Comment

0 Comments