Type Here to Get Search Results !

नगरदेवळा दिगर सेवा सहकारी सोसायटीकडून सभासदांना तातडीची सूचना

* शेतकरी सभासदांनी आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती त्वरित सोसायटीत जमा कराव्यात!

* अपूर्ण कागदपत्रांमुळे शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता

नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- नगरदेवळा दिगर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, नगरदेवळा (ता. पाचोरा, जि. जळगाव) यांच्याकडून सर्व नियमित आणि थकबाकीदार सभासद शेतकरी बांधवांना महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. संस्थेच्या अहवाल व नोंदणी प्रक्रियेसाठी सभासदांची संपूर्ण माहिती शासनाकडे पाठवणे आवश्यक असल्याने प्रत्येक सभासदाने तातडीने संबंधित कागदपत्रांची झेरॉक्स सोसायटीकडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

* सभासदांनी कागदपत्रांची झेरॉक्स अनिवार्यपणे जमा करावी :- आधार कार्ड - (जन्मतारीख अपडेट असणे आवश्यक), फार्मर (शेतकरी) आयडी / ॲग्री-स्टॅक आयडी, जिल्हा बँकेचे बँक पासबुक, मोबाईल नंबर - जो आधारकार्डशी लिंक असावा, पॅन कार्ड.


* नाव - आडनावातील स्पेलिंग एकसारखे असणे आवश्यक :- सोसायटीतर्फे सूचित करण्यात आले आहे की, वरील सर्व कागदपत्रांवरील सभासदाचे नाव व आडनाव एकसारखे असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती स्पष्ट, वाचनीय असाव्यात.


* अपूर्ण कागदपत्रांमुळे शासकीय योजनांपासून वंचित राहण्याचा इशारा :- सोसायटीने स्पष्ट केले आहे की, जर कोणतेही कागदपत्र अपूर्ण किंवा चुकीचे असल्यास संबंधित सभासद शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू शकतो. अशा स्थितीत सभासद स्वतः जबाबदार राहील, अशी नोंद सोसायटीने केली आहे.


* सभासदांनी तातडीने कागदपत्रे सादर करावीत :- ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सभासदांनी विलंब न करता सोसायटी कार्यालयात झेरॉक्स सेट जमा करावेत, असे आवाहन सोसायटीने केले आहे.


Post a Comment

0 Comments