Type Here to Get Search Results !

माघारीचा अंतिम दिवस संपला - अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली!


* खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 : एकूण 159 पैकी 34 अर्ज मागे - नगराध्यक्ष पदासाठी आता 7, तर नगरसेवक पदासाठी 118 उमेदवार रिंगणात ; अनेक प्रभागांत मोठे राजकीय बदल

खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली नगर परिषद निवडणुकीसाठी आज माघारीचा अंतिम दिवस संपल्यानंतर उमेदवारीचे अंतिम स्वरूप जाहीर झाले आहे. एकूण 159 वैध अर्जांपैकी 8 अर्ज नगराध्यक्ष पदासाठी व 151 अर्ज नगरसेवक पदासाठी दाखल झाले होते.

यापैकी नगराध्यक्ष पदासाठी 1 अर्ज मागे घेण्यात आला तर नगरसेवक पदासाठी 33 अर्ज मागे घेण्यात आले. यामुळे आता रिंगणात 7 उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी व एकूण 15 प्रभागामध्ये 118 उमेदवार नगरसेवक पदासाठी उरले आहेत. माघारीनंतरचे हे बदल आगामी लढतीचे राजकीय गणित बदलणारे ठरत असून अनेक प्रभागात त्रिकोनी, चतु:कोनी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे.

* नगराध्यक्ष पदासाठी माघार :- नासिर महेमुद मियां पटेल यांनी नगराध्यक्ष पदाचा अर्ज मागे घेतला. यामुळे नगराध्यक्षपदासाठीची स्पर्धा आता आणखी तीव्र झाली आहे.

* प्रभागनिहाय नगरसेवक पदासाठी माघार घेतलेले अर्ज :- विविध प्रभागांतून 33 उमेदवारांनी माघार घेतल्याची माहिती निवडणूक विभागाने जाहीर केली आहे. 


- प्रभाग क्र. 1 अ सारिका राजू पिंगळे

- प्रभाग क्र. 2 ब शिवानी मंगेश दळवी, मोनाली गणेश पालांडे

- प्रभाग क्र. 4 ब शिल्पा स्वप्नील सुर्वे

- प्रभाग क्र. 5 अ विनया संतोष परदेशी

- प्रभाग क्र. 5 ब विशाल तुकाराम गायकवाड

- प्रभाग क्र. 6 अ तेजल शशिकांत पुरी, अश्विनी अरुण पुरी

- प्रभाग क्र. 6 ब मीर वजीद सय्यद, मदीना अशफाक पटेल

- प्रभाग क्र. 7 ब ज्योस्त्ना रवी रोकडे, नवीन राजू हांगे, मंगेश पांडुरंग मोरे

- प्रभाग क्र. 8 अ संदेश शंकर पाटील

- प्रभाग क्र. 8 ब वैशाली मंगेश शिंदे

- प्रभाग क्र. 9 ब संतोषी ज्ञानेश्वर म्हात्रे, रोहिणी हेमंत पाटील

- प्रभाग क्र. 10 ब अंकिता प्रविण महाडिक

- प्रभाग क्र. 10 क नासिर मेहमूदमियां पाटील

- प्रभाग क्र. 11 अ ज्योती रतिलाल जैन, सुलभा यशवंत गायकवाड, अनुजा दत्तात्रेय राक्षे

- प्रभाग क्र. 12 अ वैष्णवी देवेंद्र साखरे

- प्रभाग क्र. 12 ब अर्सला अबूबकर जलगावकर

- प्रभाग क्र. 13 अ स्नेहा सचिन किर्वे

- प्रभाग क्र. 13 ब रितु यशवंत सावंत

- प्रभाग क्र. 14 अ सचिन अनंत पाटील, सुनील जनार्दन नांदे


* माघारीनंतरचे राजकीय गणित बदलणार :- माघारी झाल्यानंतर अनेक प्रभागांत लढती सरळ होण्याऐवजी अधिक गुंतागुंतीच्या झाल्या आहेत. काही प्रभागांत प्रमुख पक्षांना दिलासा मिळाला आहे, तर काही ठिकाणी स्वबळावर लढणारे उमेदवार अधिक मजबूत झाले आहेत. खोपोलीतील आगामी 2 डिसेंबरची निवडणूक त्यामुळे अधिक रोचक आणि तणावपूर्ण होण्याची चिन्हे आहेत.


Post a Comment

0 Comments