Type Here to Get Search Results !

खोपोलीत नगराध्यक्ष पदाच्या अर्जांवर आक्षेपांची झोड


* पत्रकार अनिल वाघमारे यांनी दोन्ही प्रमुख उमेदवारांवर आक्षेप घेतले ; दिवसभर चाललेल्या सुनावणीनंतर 8 नगराध्यक्ष आणि 169 नगरसेवक अर्ज वैध

खोपोली / केपी न्यूज ब्युरो :- खोपोली नगर परिषद सार्वत्रिक   मध्ये छाननी प्रक्रियेच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी दाखल  उमेदवारांवर आक्षेपांची  झडली आणि शहरातील राजकीय तापमान चांगलेच वाढले. पत्रकार तसेच अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल वाघमारे यांनी दोन्ही मुख्य राजकीय गटांच्या उमेदवारांवर गंभीर आक्षेप घेतल्याने निवडणूक कार्यालयाबाहेर तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले होते.

* डॉं. सुनिल पाटील आणि कुलदिपक शेंडे यांच्या अर्जांवर आक्षेप :- उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉं. सुनिल पाटील तर शिवसेना शिंदे गटाकडून कुलदिपक शेंडे यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले होते. छाननीवेळी पत्रकार अनिल वाघमारे यांनी दोन्ही अर्जांवर आक्षेप नोंदविल्याने निर्णयाधिकार्‍यांसमोर मोठी खळबळ उडाली. 


* कुलदिपक शेंडे यांच्यावर 2007 मधील प्रलंबित सिटी बस ठेक्याची थकबाकी :- पत्रकार वाघमारे यांनी शेंडे यांच्याविरोधात 2007 मधील सिटीबस ठेक्यासंदर्भातील थकबाकीचा मुद्दा उपस्थित केला. 


* डॉं. सुनील पाटील यांच्या कागदपत्रांवर आक्षेप :- पत्रकार वाघमारे यांच्याकडून डॉं. सुनील पाटील यांच्या काही कागदपत्रांच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आला.


दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या वकिलांनी ठोस पुरावे सादर करीत 2007 नंतर त्यांनी दोन वेळा नगरसेवक निवडणूक निर्विघ्न लढवली आणि कोणतीही अडचण आली नाही, असा युक्तिवाद केला. तरी देखील अनिल वाघमारे यांनी आपले आक्षेप कायम ठेवले.


* रात्री उशिरापर्यंत सुनावणी :- या दोन्ही नामनिर्देशनांवरील सुनावणी जवळपास 10 - 12 तासांहून अधिक काळ चालली. निवडणूक निर्णय अधिकारी, शासकीय अधिकारी, कायदेशीर सल्लागार, राजकीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या मोठ्या गर्दीमुळे कार्यालय परिसरात दिवसभर खळबळ उडाली.


* इतर उमेदवारांवरही आक्षेप :- फक्त नगराध्यक्षच नव्हे तर नगरसेवक पदाच्या अनेक अर्जांवरही प्रतिस्पर्ध्यांकडून आक्षेप घेण्यात आले. आक्षेप असलेल्या उमेदवारांमध्ये प्रभाग 4 माधवी रिठे, प्रभाग 11 संतोष मालकर व शिल्पा मालकर, प्रभाग 2 मानसी काळोखे, प्रभाग 10 हरिश काळे, प्रभाग 3 रेखा जाधव यांचा समावेश होता. या सर्व अर्जांची सुनावणी उशिरापर्यंत पार पडली.


* छाननीचा निकाल : 8 नगराध्यक्ष आणि 169 नगरसेवक अर्ज वैध :- खोपोली नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी 10 अर्ज व नगरसेवक पदासाठी 188 अर्ज प्राप्त झाले होते. छाननीनंतर 8 नगराध्यक्ष अर्ज वैध, 169 नगरसेवक अर्ज वैध अशी आकडेवारी प्रशासनाने जाहीर केली आहे. उर्वरित अर्ज विविध कारणांमुळे अमान्य ठरविण्यात आले.


* निवडणुकीचा रंग आता अधिक गडद :- छाननीवेळी झडलेल्या आक्षेप - प्रत्याक्षेपांच्या मालिकेमुळे खोपोलीतील वातावरण तापले आहे. दोन्ही पक्षांचे नेते व कार्यकर्ते एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करीत असून आगामी दिवसांत निवडणुकीची लढत अधिक तीव्र होणार हे निश्चित झाले आहे. नगराध्यक्षपदाच्या प्रमुख उमेदवारांवरील आक्षेपांनी शहरात उत्सुकता आणि राजकीय खळबळ शिगेला पोहोचली आहे.


Post a Comment

0 Comments