* कोमसाप पनवेल शाखेतर्फे प्रतिष्ठित सन्मान
* साहित्यिक मान्यवरांच्या उपस्थितीत खोपोलीचे सुपुत्र गौरवले
रायगड / प्रतिनिधी :- कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप), पनवेल शाखेतर्फे आयोजित भव्य साहित्यिक गौरव सोहळ्यात खोपोलीचे सुप्रसिद्ध साहित्यिक डॉं. सुभाष हरिबा कटकदौंड यांना मानाचा, प्रतिष्ठित सन्मान प्रदान करण्यात आला. 15 नोव्हेंबर 2025 रोजी नवीन पनवेल येथे रंगलेल्या या कार्यक्रमात साहित्यविश्वातील दिग्गजांच्या उपस्थितीत डॉं. कटकदौंड यांच्या साहित्यिक कार्याचा गौरव करण्यात आला.
* रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान :- या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरलेले सन्मानचिन्ह लोकनेते व माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते डॉं. कटकदौंड यांना प्रदान करण्यात आले. या प्रसंगी साहित्यविश्वातील ख्यातनाम कवी अशोक नायगावकर, कवी अरुण म्हात्रे, ज्येष्ठ गजलकार ए. के. शेख हे मान्यवर उपस्थित होते. त्यांनी डॉं. कटकदौंड यांच्या साहित्यिक कर्मभूमीचे मनापासून कौतुक केले. त्यांच्या कवितांनी, लेखनाने आणि विचारांनी वाचकांना दिलेली नवी दिशा उल्लेखनीय असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
* हा सन्मान माझ्यासाठी प्रेरणादायी - डॉं. कटकदौंड :- सन्मान स्विकारताना डॉं. कटकदौंड म्हणाले की, माझ्या साहित्य प्रवासाला मिळालेली ही मानाची पावती आहे. हा सन्मान मला पुढील साहित्यसेवेसाठी अधिक ऊर्जा, प्रेरणा आणि नवी उमेद देणारा आहे. या सन्मानामागे वाचकांचे प्रेम आणि सहकाऱ्यांचा पाठिंबा आहे. तसेच त्यांनी कोमसाप पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी आणि सर्व आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.
* स्थानिक साहित्यचळवळीला नवी दिशा :- खोपोली आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यातून डॉं. कटकदौंड यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या सन्मानामुळे स्थानिक साहित्य चळवळ अधिक बळकट होणार असून तरुण पिढीला प्रेरणा मिळेल, अशी भावना व्यक्त होत आहे. डॉं. कटकदौंड यांच्या साहित्यिक योगदानामुळे खोपोली शहराचे नाव राज्यभर उज्ज्वल झाल्याचा अभिमान स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे.

Post a Comment
0 Comments