* चाळीसगांव नगर परिषद निवडणूक 2025 : नगराध्यक्ष पदासह विविध प्रभागांतून तब्बल 83 उमेदवारांची माघार
* रिंगणात आता 119 उमेदवार - मुख्य लढत देशमुख शहर विकास आघाडी विरुद्ध भाजपा
चाळीसगांव / फिरोज पिंजारी :- चाळीसगांव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशन अर्जाच्या माघारीची प्रक्रिया आज, 21 नोव्हेंबर 2025 रोजी संपन्न झाली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रमाद हिले यांनी नमुना 6 नियम 9 (2) नुसार जारी केलेल्या सूचनेनुसार, 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी मिळून एकूण 83 वैध उमेदवारांनी माघार घेतली आहे. यामुळे आता चाळीसगांव नगर परिषद निवडणुकीत एकूण 119 उमेदवार रिंगणात उरले आहेत.
* नगराध्यक्ष पदासाठी आता चार प्रमुख उमेदवार मैदानात :- माघारीनंतर नगराध्यक्ष पदाची निवडणूक अधिक थेट स्वरूपात जाणार आहे. अंतिम रिंगणात पद्मजाताई राजीव देशमुख (मा. लोकनेते अनिल दादा देशमुख शहर विकास आघाडी), प्रतिभाताई मंगेश चव्हाण (भारतीय जनता पार्टी), राहुल भीमराव जाधव (आम आदमी पार्टी), समाधान भीमराव पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - अजित पवार गट) हे चार उमेदवार आहेत.
* नगराध्यक्ष पदासाठी माघार :- अभिषेक राजीव देशमुख यांनी 21 नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदाचा अर्ज मागे घेतला. मात्र, ते प्रभाग क्र. 16 (अ) मधून नगरसेवक म्हणून निवडणूक लढविणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्या मातोश्री पद्मजाताई राजीव देशमुख या नगराध्यक्षपदासाठी अधिकृतरित्या मैदानात आहेत.
* दोन दिवसांत प्रभागनिहाय माघारीचे संपूर्ण चित्र :- 20 नोव्हेंबर 2025 रोजी प्रभाग 1 अ : सौरभ अनिल पाटील, प्रभाग 4 अ व 4 ब : स्मितल दिनेश बोरसे, प्रभाग 6 अ : गीता महेंद्रसिंग पाटील, प्रभाग 9 ब : धम्मपाल राजेंद्र अहिरे तर 21 नोव्हेंबर 2025 रोजी प्रभाग 1 अ राहुल साहेबराव पाटील, प्रभाग 1 ब कल्पना हिरामण पाटील, नंदा विलास गोत्रे, प्रभाग 2 अ आशाबाई विठ्ठल म्हस्के, आकाश शंकर पोळ, प्रभाग 3 ब (सर्वाधिक माघारी) वैशाली नितिन भामरे, स्मिता दीपक पाटील, अलका भिमराव बोरसे, शारदा रविंद्र जाधव, प्रभाग 4 अ कल्पेश सुनिल महालपुरे, अनिता संदीप सोनवणे, दिनेश भिमराव मोरे, प्रभाग 5 अ रुपाली मनोहर चौधरी, शुभांगी गोकूळ चौधरी यांनी माघार घेतली.
* 83 माघारीनंतर आता 119 उमेदवार रिंगणात :- नगराध्यक्ष पदावरील स्पर्धा आता अधिक चुरशीची झाली आहे. तर अनेक प्रभागांत त्रिकोनी व चतु:कोनी लढती होणार असून काही प्रभागांत अपक्षांचे अस्तित्व ठळकपणे जाणवणार आहे.
* प्रमुख राजकीय लढतीचा वेग वाढणार :- 83 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता चाळीसगांवमध्ये मा. लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडी व भारतीय जनता पार्टीमध्ये मुख्य सामना होणार आहे. तसेच काही प्रभागांत अपक्ष उमेदवारांचे समीकरण निवडणुकीचा निकाल बदलू शकतात, अशी राजकीय सूत्रांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता प्रचार मोहीम तीव्र होणार असून, सर्वच पक्षांनी जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे.

Post a Comment
0 Comments