* कडाक्याच्या थंडीत शेकोटीचा आनंद…पण परिसरात बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
शिरूर / अकबर पिंजारी :- शिरूर तालुक्यातील पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका प्रचंड वाढला आहे. विशेषत: कवठे येमाई परिसरात सकाळ - संध्याकाळ चांगलीच थंडी जाणवत आहे. हवेत दाट धुके, गोठवणारी थंडी आणि रात्रीचे तापमान घटल्याने नागरिकांना उब मिळवण्यासाठी शेकोटीभोवती बसावे लागत आहे.
* शेकोटीचा आनंद…पण मनात भीतीची सावली :- थंडीमुळे ग्रामस्थ शेकोटी करीत असले तरी मनात भीतीचे सावट कायम आहे. कारण पश्चिम भागात बिबट्याचा वाढता वावर आणि दहशत. अलीकडेच बिबट्याच्या हालचाली वाढल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जंगलालगतच्या भागात रहिवाशांची हालचाल मर्यादित झाली असून, शेकोटी करताना ही कुठे बिबट्या अचानक येणार नाही ना अशी भीती सतत जाणवत आहे.
* कडाक्याच्या थंडीत ग्रामस्थांची शेकोटीतून ऊब :- भीती असूनही थंडीपासून बचाव करण्यासाठी ग्रामस्थ शेकोटीभोवती बसून ऊब घेत आहेत. कवठे गावातील काळे आळीतील मित्र परिवार एकत्र येऊन शेकोटीचा आनंद लुटत असल्याचे दृश्य उबदारता आणि सोबतीची भावना दर्शवते. या आनंदी क्षणात समिर शाह, संजना शाह, गुरुप्रसाद शहा, मनीष शहा, शहा परिवार, फिरोज पिंजारी, सुमैया पिंजारी, रुकसाना पिंजारी, काफीया पिंजारी आदी मंडळींनी एकत्र येऊन शेकोटीचा आनंद घेतला.
थंडीचा कडाका, बिबट्याची दहशत आणि शेकोटीतील ऊब, ग्रामीण भागात हा विरोधाभास सध्या ठळकपणे दिसत आहे.

Post a Comment
0 Comments