* अडावद येथील धक्कादायक प्रकार ; अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल
चोपडा / प्रतिनिधी :- चोपडा तालुक्यातील अडावद परिसरात एका महिलेला तिच्या इच्छेविरुद्ध वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी धानोरा येथील पती-पत्नीवर गुन्हा दाखल केला असून, या अमानवी कृत्यामुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे.
* पीडितेला फसवून घरात ठेवले आणि जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करविला :- मूळची येलदरी (जि. हिंगोली) येथील असलेली पीडिता काही दिवसांपूर्वी आरोपींच्या संपर्कात आली. आरोपी चंद्रकांत सुपडू सोनवणे (45) आणि त्याची पत्नी शीला चंद्रकांत सोनवणे (42) यांनी तिला फसवून आपल्या धानोरा येथील घरात आणले. यानंतर तिला जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले, तिच्या कमाईवर दोघेही उपजीविका चालवू लागले, अशी धक्कादायक माहिती तपासादरम्यान समोर आली.
* पती-पत्नीचा गैरमानवी व्यवहार उघड :- तपासात हे स्पष्ट झाले की आरोपी चंद्रकांत सोनवणे हा पीडितेच्या वेश्याव्यवसायातून होणाऱ्या कमाईवर आपले पोट भरत होता. पत्नी शीलाही या गुन्ह्यात सक्रिय सहभागी असल्याचे पोलिसांनी नोंदवले आहे.
* अडावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल :- या प्रकरणाची तक्रार अडावद पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली. या घटनेत पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध 'अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम' (PITA Act) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. घटना 17 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली असून, प्रकरणाची पुढील तपासणी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ करीत आहेत.
* कठोर कारवाईची मागणी :- या अमानवी प्रकरणानंतर परिसरातील नागरिकांकडून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. महिलांच्या शोषणासंदर्भातील अशा घटनांनी पुन्हा एकदा मानवी तस्करीची भीषणता अधोरेखित केली आहे.

Post a Comment
0 Comments