* त्या नराधमास फाशी द्या’ - सकल हिंदू समाज पाचोऱ्याची प्रशासनाकडे ठाम मागणी
पाचोरा / प्रतिनिधी :- मालेगाव तालुक्यातील डोंगराळे (जि. नाशिक) येथे तीन वर्षीय चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि निघृण हत्येच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. या भीषण कृत्यामुळे समाजात संताप उसळला असून, संतप्त नागरिकांकडून तीव्र निषेध नोंदवला जात आहे. ही घटना मानवतेला काळिमा फासणारी असल्याची भावना विविध संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
* पाचोरा सकल हिंदू समाजाचे निवेदन :- पाचोरा येथील सकल हिंदू समाजातर्फे पाचोरा पोलिस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात आरोपीला तात्काळ अटक, भारतीय न्याय संहितेनुसार सर्वाधिक कठोर शिक्षा, आणि न्यायालयामार्फत थेट फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम व स्पष्ट मागणी करण्यात आली आहे.
सकल हिंदू समाजाच्या प्रतिनिधींनी म्हटले की, तीन-चार वर्षांच्या निरागस चिमुकलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमाला समाजात जागा नाही. अशा घृणास्पद कृत्यास फाशीशिवाय दुसरी शिक्षा योग्य नाही.
* समाजात रोष - कठोर कारवाईची अपेक्षा :- या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची ठिणगी पसरली असून, या प्रकरणी जलदगतीने तपास करून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी, अशी सर्वांची मागणी आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी अशा प्रकरणांत उदाहरणार्थ शिक्षा देणे आवश्यक असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे.
* पोलिस व प्रशासनावर दबाव :- निवेदन स्विकृत करताना प्रशासनाने योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. दरम्यान, नागरिकांनी पुढील काही दिवसांत या प्रकरणातील तपासाची गती वाढवावी, अशी मागणी केली आहे.

Post a Comment
0 Comments