Type Here to Get Search Results !

साधनाताई महाजन बिनविरोध नगराध्यक्ष नियुक्त

* जामनेरला तिसऱ्यांदा मिळाले दृढ नेतृत्व

* जामनेर नगरपालिकेत 6 नगरसेवकही बिनविरोध

* नगराध्यक्षपदासाठी साधनाताईंचा एकमेव अर्ज कायम

* मंत्री महाजन यांचा प्रभाव आणि संघटनशक्ती पुन्हा सिद्ध

जामनेर / प्रतिनिधी :- जामनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदावर पुन्हा एकदा साधनाताई महाजन यांची बिनविरोध निवड झाली असून, सलग तिसऱ्यांदा नगराध्यक्षपदाची संधी मिळाल्याने शहरात आनंदाचे आणि कौतुकाचे वातावरण निर्माण झाले आहे. नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या अर्जांमधून शेवटी साधनाताईंचा एकमेव अर्ज उरल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.


जामनेरात केवळ नगराध्यक्षच नव्हे तर 6 नगरसेवकही बिनविरोध निवडून आले आहेत. या विजयामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून शहरात आनंदोत्सव साजरे करण्यात आले. पक्षाच्या संघटनशक्तीचे आणि गेल्या काही वर्षांतील विकासकामांच्या भक्कम उत्तराधिकारीपणाचे हे यश मानले जात आहे.

 बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक :-

प्रभाग क्रमांक 11 ब - उज्वला दीपक तायडे

प्रभाग क्रमांक 1 अ - सपना रविंद्र झाल्टे

प्रभाग क्रमांक 13 अ - महेंद्र कृपाराम बाविस्कर

प्रभाग क्रमांक 13 ब - किलूबाई गीमल्या शेवाळे

प्रभाग क्रमांक 2 - श्रीराम महाजन

प्रभाग क्रमांक 5 अ - संध्या जितेंद्र पाटील

साधनाताई महाजन यांच्या नेतृत्वाखाली जामनेरमध्ये मागील दोन कार्यकाळात अनेक सकारात्मक विकासकामे झाली असून, नागरिकांनी त्यांच्यावर कायम ठेवलेल्या विश्वासाचे प्रतिबिंब या बिनविरोध निवडणुकीत दिसून आले आहे. त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातही शहराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Post a Comment

0 Comments