* जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत पाच संघांची चमकदार कामगिरी
* तीन संघांची नाशिक विभागीय पातळीवर निवड
नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- ग्राम शिक्षण समिती संचलित सरदार एस. के. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नगरदेवळा येथील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत उत्तुंग यश मिळवून विद्यालयाचा नावलौकिक वाढविला आहे. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तीन संघांची नाशिक विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
* जिल्हास्तरीय स्पर्धेतील विद्यालयाची विजयी कामगिरी :- स्पर्धेत विद्यालयातील 19 वर्ष मुलांचा संघ - विजेता, 19 वर्ष मुलींचा संघ - विजेता, 17 वर्ष मुलींचा संघ - विजेता, 14 वर्ष मुलांचा संघ - उपविजेता, 14 वर्ष मुलींचा संघ - तृतीय क्रमांक या पाच संघांनी प्रभावी कामगिरी करीत यश संपादन केले. या उल्लेखनीय प्रदर्शनामुळे शाळेची क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठा अधिक वृद्धिंगत झाली आहे.
* विभागीय स्तरावर तीन संघांची धडाकेबाज एंट्री :- जिल्हास्तरीय विजयानंतर 19 वर्ष मुलांचा संघ, 19 वर्ष मुलींचा संघ, 17 वर्ष मुलींचा संघ या तीन संघांची नाशिक विभागीय आट्यापाट्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नगरदेवळा व आसपासच्या भागात या कामगिरीचे मोठे कौतुक होत आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे विद्यालयातील क्रीडा विभागाचा सातत्यपूर्ण परिश्रम आहे. मार्गदर्शन करणारेक्रीडा विभाग प्रमुख पी.आर. शिरुडे सर, डी. पी. राजपूत सर, एस. आर. महाजन सर, एम. एस. जाधव मॅडम, अमोल साळुंखे सर, वकार शेख सर यांच्या प्रशिक्षणामुळे संघांनी उत्कृष्ट खेळ कौशल्य सादर केले.
निवड झालेल्या सर्व संघांचे ग्राम शिक्षण समितीचे व्हाइस चेअरमन सुभाष थेपडे, मानद चिटणीस शिवनारायण जाधव, संचालक किशोर पाटील, जगन्नाथ पाटील, वामन पाटील, अब्दुल गनी शेख, नथू महारू पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत विभागीय स्तरावरही उत्तम यश मिळावे असे शुभाशिर्वाद दिले.
विद्यार्थ्यांच्या यशस्वी कामगिरीचे प्राचार्य के. एन. काटकर सर, उपप्राचार्य गहरवाल सर, पर्यवेक्षक वाई. डी. ठाकूर सर, डी. पी. राजपूत सर, एस. पी. बावस्कर सर, जी. यू. पवार सर, डॉं. के. ए. चव्हाण सर आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.

Post a Comment
0 Comments