* विकासाच्या नव्या वाटचालीला सुरुवात : प्रभाग 4, 5, 6, 10, 11 व 14 मधील कार्यालयांचे आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते उद्घाटन
खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर महायुतीने विकासाभिमुख आणि सुसंघटित निवडणूक मोहिमेला गती दिली आहे. गुरुवार, 21 नोव्हेंबर संध्याकाळी 6 वाजता शहरातील प्रभाग क्रमांक 4, 5, 6, 10, 11 व 14 मधील महायुतीच्या प्रचार कार्यालयांचे भव्य उद्घाटन उत्साहात पार पडले.
उद्घाटन सोहळ्यास महायुतीचे प्रमुख नेते आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेंद्र थोरवे, महायुतीकडून नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार कुलदीपक शेंडे तसेच शिवसेना (शिंदे), भारतीय जनता पार्टी व आरपीआयचे पदाधिकारी, नगरसेवक पदाचे उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचार कार्यालयांतील उत्साह, घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहता महायुतीचा आत्मविश्वास अधिक दृढ झाल्याचे स्पष्ट दिसून आले.
* कुलदीपक शेंडे नगराध्यक्ष होतील, हा खोपोलीकरांचा विश्वास - आमदार थोरवे :- कार्यक्रमात बोलताना आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, खोपोलीकरांनी विकास निष्ठ नेतृत्वाला नेहमीच पाठिंबा दिला आहे. त्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. तेवढ्याच विश्वासाने कुलदीपक शेंडे हे नक्कीच नगराध्यक्ष होतील, आणि महायुतीचे सर्व अधिकृत उमेदवार विजयी होतील. त्यांच्या भाषणाने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त ऊर्जा संचारली.
* महायुतीचा विजय अटळ - आमदार प्रशांत ठाकूर :- पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले की, खोपोलीतील नागरिकांचा प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांची ऊर्जा पाहता महायुतीचा विजय निश्चित आहे. ही युती केवळ राजकीय नाही ; ती विकासाच्या ध्येयावर आधारित आहे. खोपोलीकर महायुतीसोबत खंबीरपणे उभे आहेत.
* कार्यकर्त्यांचा उत्साह, नागरिकांची उपस्थिती - प्रचाराला मिळाली नवी गती :- या कार्यक्रमात शिवसेना, भाजप आणि आरपीआयच्या विविध शाखांतील प्रमुख पदाधिकारी, संभाव्य नगरसेवक आणि नव्या उमेदवारांचा हजेरी लक्षणीय होती. शहरातील निवडणूक वातावरणात नवीन जोश, नवी ऊर्जा आणि महायुतीच्या एकसंधतेचा ठसा उमटतो आहे. प्रचार कार्यालयांच्या भव्य उद्घाटनामुळे महायुतीने खोपोलीच्या राजकीय वातावरणावर जोरदार पकड मजबूत केल्याचे चित्र स्पष्ट आहे.

Post a Comment
0 Comments