* राष्ट्रीय कुस्तीपटू क्षितिजा मरागजे यांच्या हस्ते महोत्सवाचा भव्य शुभारंभ
* संचलन, क्रीडा शपथ आणि विद्यार्थ्यांचा जोशपूर्ण सहभागाने परिसर क्रीडामय
* क्रीडा संस्कारांचा उत्सव - 2025 चा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात पार
खोपोली / प्रतिनिधी :- विद्या प्रसारिणी सभा चौक संचलित प्राथमिक विद्यामंदिर व शिशुमंदिरचा वार्षिक क्रीडा महोत्सव शुक्रवारी, दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी दिमाखात संपन्न झाला. राष्ट्रीय कुस्तीपटू क्षितिजा जगदीश मरागजे यांच्या हस्ते झेंडावंदन करून भव्य शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेच्या अध्यक्षा व कार्याध्यक्षा शोभाताई देशमुख यांनी भूषविले. याशिवाय संस्थेचे सेक्रेटरी योगेंद्र शहा, संचालक राजेंद्र कापरेकर, सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक गायकवाड, संस्थेचे पर्यवेक्षक व समन्वयक देवानंद कांबळे, हेल्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ साठेलकर, मंगेश सावंत, पूजा मरागजे, प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका व संचालिका सुलभा गायकवाड तसेच अन्य शिक्षकवर्ग, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या भव्य संचलनाने झाली. विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्या क्षितिजा मरागजे यांना शिस्तबद्ध संचलनातून दिमाखात मानवंदना अर्पण केली. यानंतर त्यांच्या हस्ते क्रीडांगण पूजन करून महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन झाले.
समन्वयक देवानंद कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत पाहुण्यांचा परिचय करून दिला. हेल्प फाउंडेशनचे अध्यक्ष गुरुनाथ साठेलकर यांनी विद्यार्थ्यांना संतुलित आहार, मोबाईलचा मर्यादित वापर, क्रिडेचे शारीरिक व मानसिक फायदे याविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करीत विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला.
* राष्ट्रीय खेळाडूचा प्रेरणादायी अनुभव :- राष्ट्रीय कुस्तीपटू क्षितिजा मरागजे यांनी शालेय पातळीपासून राष्ट्रीय स्तरापर्यंतचा प्रवास प्रत्यक्ष अनुभवातून सांगत विद्यार्थ्यांना परिश्रम, शिस्त आणि सातत्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या भाषणाने उपस्थित विद्यार्थ्यांना मोठी प्रेरणा मिळाली.
* अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन :- अध्यक्षीय भाषणात शोभाताई देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक करीत क्रीडा जीवनातील गरज अधोरेखित केली आणि सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन माधवी यांनी केले तर आभार अश्विनी वडवले यांनी मानले.
* क्रीडा शपथ आणि विविध स्पर्धांना उत्साहपूर्ण सुरुवात :- यानंतर समन्वयक देवानंद कांबळे यांनी सर्व खेळाडूंना क्रीडा शपथ दिली. क्रीडा शिस्त, प्रामाणिकपणा आणि खेळभावना जपण्याची शपथ घेतल्यानंतर विविध क्रीडा स्पर्धांना जोरदार सुरुवात झाली.
* विद्यार्थ्यांचा जबरदस्त सहभाग :- विद्यार्थ्यांचा प्रचंड उत्साह, शिस्त आणि खेळातील सहभाग यामुळे संपूर्ण शाळेचा परिसर क्रीडानादाने आणि उत्साहाने गाजत होता. महोत्सवात धावण्याच्या स्पर्धा, रिले, लांब उडी, अग्निशमन, योगासन, रस्सीखेच यांसह विविध खेळांचे सत्र पार पडले.

Post a Comment
0 Comments