Type Here to Get Search Results !

समीर रफीक खान यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उत्तर महाराष्ट्र सोशल मीडिया अध्यक्षपदी निवड

* अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी जबाबदारी

धुळे / प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटनात्मक बळकटीसाठी आणि डिजिटल प्रभाव वाढविण्यासाठी पार्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, समीर रफीक खान यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उत्तर महाराष्ट्र सोशल मीडिया अध्यक्षपदी निवड झाली आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे तसेच सोशल मीडिया प्रदेशाध्यक्ष आनंद पवार यांच्या उपस्थितीत हे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.


* जबाबदारी सक्षमपणे पार पाडेन - समीर खान :- नियुक्तीनंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करतांना समीर रफीक खान म्हणाले की, पक्षाने माझ्यावर ठेवलेला विश्वास मी पूर्ण ताकदीने पेलणार आहे. उत्तर महाराष्ट्राच्या डिजिटल संघटनेला बळकटी देणे, पक्षाची विचारधारा युवापिढीपर्यंत पोहोचवणे आणि सोशल मीडिया व्यवस्थेत एकसंध व सक्षम समन्वय साधणे हे माझे प्रमुख ध्येय असेल.


* नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान :- धुळे शहराचे आमदार डॉं. फारुख शाह यांच्या हस्ते समीर खान यांनी नियुक्तीपत्र स्विकारले. या प्रसंगी पक्षातील प्रमुख नेत्यांनी अभिनंदन करून नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.


समीर खान यांनी मंत्री छगन भुजबळ, अल्पसंख्यांक मंत्री माणिकराव कोकाटे, माजी मंत्री, आमदार अनिल भाईदास पाटील, आमदार फारुख शाह, आमदार आशुतोष काळे, धुळे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉं. अभिजीत मोरे तसेच उत्तर महाराष्ट्रातील सर्व वरिष्ठ नेते, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मान्यवरांचे आभार व्यक्त केले. समीर खान यांनी या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानत पक्षवाढीसाठी पूर्ण समर्पित राहण्याची ग्वाही दिली.


Post a Comment

0 Comments