Type Here to Get Search Results !

मला एक संधी द्या, खोपोलीचा चेहरामोहरा बदलून दाखवेन!

* महायुतीचे उमेदवार कुलदिपक शेंडे यांचे खोपोलीतील मतदारांना आवाहन : खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 

खोपोली / फिरोज पिंजारी :- नगर परिषद निवडणूक 2025 ची रणधुमाळी सुरू होताच महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदिपक शेंडे यांनी मतदारांशी थेट संवाद साधत शहराच्या सर्वांगीण विकासाची हमी दिली आहे. 19 नोव्हेंबर रोजी धाकटी पंढरी येथे विठ्ठलाचे दर्शन घेऊनच त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केला.

* मी नगराध्यक्ष म्हणून निवडून आलो, तर खोपोलीचा भविष्यकाळ बदलून टाकेन :- मतदारांना थेट आवाहन करताना कुलदिपक शेंडे यांनी आपली रणनिती, भुमिका स्पष्ट केली.

- पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची सोडवेन :- बारमाही वाहणारी पाताळगंगा नदी आहे, पण पाण्याचा साठा करण्यासाठी सुविधा नाहीत. मी निवडून आलो तर सर्वात पहिले पाणी साठवण प्रकल्प, जलशुद्धीकरण आणि वितरण व्यवस्था उभारण्यावर काम करणार आहे.

- पाताळगंगा नदी परिसराला पर्यटनाचा चेहरा देईन :- नदीच्या दोन्ही काठांवर मी चौपाटीसारखे सौंदर्यीकरण, लाइटिंग, वॉकवे, मनोरंजन क्षेत्र उभारून खोपोलीला पर्यटन नकाशावर आणणार आहे.

- शहरातील वाहतूक कोंडी दूर करेन :- विशेषतः शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक व इंदिरा चौक येथील वाहतूक कोंडीवर मी पक्के उपाय करेन. बाजारपेठ, दीपक हॉटेल, सागर प्लाझा, भाजी मार्केट परिसर येथे नियोजनबद्ध वाहतूक मार्ग तयार करणार आहे.

- रस्ते, पाणी, स्ट्रीट लाइट, आरोग्य आदी मूलभूत सुविधा मजबूत करेन :- नगर परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिक सुविधा उपलब्ध करून देईन. नवीन रस्ते, स्ट्रीट लाईट आणि स्वच्छता व्यवस्थेवर जोर देईन. शिक्षण, आरोग्य, वाहतूक या प्रत्येक क्षेत्रात खोपोलीकरांना दिलासा देणारे निर्णय घेईन.

- खोपोलीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनवेन :- ही माझी महत्त्वाकांक्षा नाही, तर खोपोलीकरांसोबत केलेले वचन आहे. एक संधी द्या… शहराचा चेहरामोहरा बदलून दाखवेन.


* विकासाची परंपरा पुढे नेऊ, महायुतीला विजयी करा :- कुलदिपक शेंडे म्हणाले की, खोपोलीकरांनी विधानसभा निवडणुकीत आमदार महेंद्र थोरवे यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना विजय मिळवून दिला. तेव्हापासून शहरात कोट्यवधींचा निधी येऊन पायाभूत सुविधा निर्माण झाल्या. आता नगर परिषद ही महायुतीच्या ताब्यात आली तर शहराचा विकास दुप्पट वेगाने होईल.


मला एक संधी द्या - खोपोलीला विकासाच्या रथावर आरूढ करतो, अशा शब्दांत कुलदिपक शेंडे यांनी मतदारांना भावनिक आवाहन केले आहे. त्यांच्या मागे महायुतीचे सर्व नेते एकदिलाने उभे असून प्रचाराला उर्जा मिळाली आहे. आमदार महेंद्र थोरवे, आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार सुरेश लाड यांच्यासह महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदिपक शेंडे व महायुतीचे नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या विजयासाठी कामाला लागले आहेत.

Post a Comment

0 Comments