Type Here to Get Search Results !

वाहतूक पोलिस शाखेच्या कारवाईनंतर वाहतूक कोंडी दूर

* नागरिकांनी मानले आभार

पनवेल / प्रतिनिधी :- सोमटणे कंटेनर फ्रट स्टेशनला येणाऱ्या शेकडो ट्रक, ट्रेलरच्या बेकायदेशीर पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत असल्याने त्यावर 1 मे रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ सदस्य साबीर शेख यांनी नवीन पनवेल पोलिस वाहतूक शाखेकडे पाठपुरावा केला होता व त्या बाबतीत कायमस्वरूपी उपयोजना व्हाव्यात अशी मागणी केली होती. यावर दैनिक पुण्यनगरी, दै. कृषिवल, दै. रायगड न्युज अश्या विविध लोकप्रिय वृत्तपत्रांनी नागरी समस्यांची दखल घेऊन बातमी प्रसिद्ध केली असता त्यावर वाहतूक पोलिस विभागाकडून वाहतुक नियंत्रण करून ती कायमस्वरूपी सुरक्षित व सुरळीत व्हावी यासाठी युद्ध पातळीवर पावले उचलली गेली व त्याचा परिणाम रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न तात्पुरता का होईना तात्काळ नियंत्रणात आला असल्याने प्रवासी व नागरिकांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे व कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिस शाखेचे आभार मानले आहेत.   

 

भविष्यात लॉजिस्टिक व्यवस्थापन, ट्रान्सपोर्टर व त्यांचे ट्रक चालक यांचा बेजबाबदारपणा दिसल्यास, रस्ता सुरक्षा, वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्यास वाहतूक नियंत्रण विभागाकडून कठोर कारवाई केली जावी असे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ सदस्य साबीर शेख यांनी मागणी करून नवीन पनवेल वाहतूक शाखा पोलिस निरीक्षक सूरज पाटील तसेच घटनास्थळी कर्तव्य बजावणारे पोलिस हवालदार संजय जाधव, राकेश भोईर, सुमित सरगर व त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments