Type Here to Get Search Results !

आ. विक्रांत पाटील यांच्या हस्ते खालापूर तहसील कार्यालयात ध्वजारोहण

* अभिमान व अस्मितेच्या भावनेतून विविध विधायक कार्यातून महाराष्ट्र दिन साजरा - आ.विक्रांत पाटील

खालापूर / साबीर शेख :- 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या  66 व्या वर्धापन दिनानिमित्त खालापूर तालुक्यातील ध्वजारोहणाचा मान आमदार विक्रांत पाटील यांना मिळाला. दिवसभर विविध विधायक कार्यातून कामगार दिन व महाराष्ट्रातील WAVES 2025 च्या माध्यमातून पंतप्रधान राष्ट्रसेवक नरेंद्र मोदी यांच्या कार्याची माहिती देऊन तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली देशात सर्वात बळकट राज्य होण्यासाठी आपण साऱ्यांनी एकसंघ होऊन राष्ट्र निर्माण कार्यातील महाराष्ट्राचे महत्त्व जगाला दाखवू या अश्या भावनेतून संस्कृती, कला, राष्ट्रीय धोरण, रोजगार, शिक्षण अशा विविध विषयांवर अभ्यासू भाषणे केली व मोदी सरकार  मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सदैव 1 नंबर असेल असा विश्वास व्यक्त केला.


स्वतंत्र मराठी भाषिक राज्य व्हावे म्हणून आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सेनानी यांना  आपल्या जनसेवा कार्यालयाच्या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सामूहिक मानवंदना देण्यात आली. समाधीन निर्मित 'मराठी पाऊल पडते पुढे, मराठी संस्कृतीचा सुंदर संगीतमय सांगीतिक जागर पनवेलकरांना अनुभवायला मिळाला. यावेळी लोकसेवेच्या भावनेतून जनजागृती करणाऱ्या सेवक, तसेच विविध क्षेत्रात नामलौकीक मिळवणाऱ्या व्यक्तींचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 


कामगार दिनाच्या निमित्ताने युवकांनी येणाऱ्या नोकरी उद्योगधंद्याकडे पाहताना आपल्यातील नाविन्यपूर्ण तांत्रिक कलेला सरकारच्या शैक्षणिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून पात्र केले पाहिजे. ज्याने युवकांना रोजगार कामगार धोरण देताना सरकारला आपल्यासाठी योग्य निर्णय घेण्यात अडचणी जाणार नाहीत. महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी एकसंघ एकदिलाने मराठी धर्म माणून कार्य करू सर्वांना सोबत घेऊ. या निमित्ताने असा संकल्प करून महाराष्ट्र दिन साजरा करू या असे बोलून सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. मराठी पाऊल पडते पुढे मराठी संस्कृतीचा सांगीतिक जागर कार्यक्रमात भाजप ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवर व सहकारी मित्र, परिवारांना महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देऊन सन्मान व सत्कार करून आभार मानले. या कार्यक्रमात पनवेलकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून महाराष्ट्र दिन जल्लोषात साजरा केला.

Post a Comment

0 Comments