कोराडी / मिलिंद गाडेकर :- चित्रकूट वरून नागपूर येथे आलेल्या श्री हनुमान मूर्ती घोगली लेआऊट महानुभाव नगर येथे आणण्यात आली. तत्पूर्वी सायंकाळी 5 वाजता परिसरातील महिला, युवती, पुरुष, जेष्ठ नागरिक, लहान बालके आदींनी श्री भांगे यांच्या पुलाजवळील मोड रोडवर फटाके, वाजंत्रीसह श्री हनुमान रायाच्या मुर्तीचे पुजारी, समितीचे भक्त गणांचे स्वागत केले.
श्री महावीर बजरंग बली की जय, पवनसुत हनुमान की जय, जय जय श्री राम अश्या घोषणांनी आणि जयकारांनी परिसर दुमदुमून गेला. महिला, नागरिक भक्तगणांनी तालासुरावर एकच ठेका धरला होता. पुजारी अरविंद मिश्र यांच्या निर्देशाने सात जणांनी श्री हनुमान यांची मुर्ती गाभाऱ्यात नेऊन विधिवत पूजा केली. रात्री 8 वाजता महाआरती करण्यात आली.
यावेळी घोगली गावचे सरपंच राहुल सोनारे, उपसरपंच ओमप्रकाश भांगे, ग्रामपंचायत सदस्या अपर्णा गाडेकर, संकट मोचन हनुमान मंदिर समितीचे अध्यक्ष भागवत सनोडीया, सचिव महेश शुक्ला, उपाध्यक्ष सुशील तिवारी, उपसचिव गोपाल उमांते, नामदेव राऊत, दिनेश कोहळे, बाबुराव राऊत, नम्मु साहू, सामाजिक कार्यकर्ते नितीन नारे, प्रतीक्षा शेलारे, राजु ऊदापूरे, राजु येडे, गोपाल बेंदेवार, ज्ञानेश्वर हरिंणखेडे, रामभाऊ पटले, गौतम लीलाधर, नरेश कुहीते, मुंनीताई इवनाते, विशाल इवनाते, रमा पंडित, वादुळे, चौरसिया, गौतम शेलारे, दशरथ दमांहे, प्रतीक्षा भंडारी, संकेत गोंडाने, रागिणी गोंडाने, चंद्रशेखर अरखैल, आम्रपाली माडामे, ओमकार सनोडीया, सेखार आदमाने, वंश वालोकार, दामू क्षीरसागर यांनी उपस्थिती होती.
Post a Comment
0 Comments