* महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी थरारक सिनेमाचा अनुभव घेऊन येणारा मराठी चित्रपट - डेव्हिड लोखंडे
कोल्हापूर / जगदीश का. काशिकर :- महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी थरारक सिनेमाचा अनुभव घेऊन येणारा “प्रलय” हा मराठी चित्रपट येत्या 31 ऑक्टोबर 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर व ट्रेलर अनावरण सोहळा 20 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता कोल्हापूर येथील मुस्कान लॉनमध्ये उत्साहात पार पडला.
चित्रपटाचे निर्माते सरदार हिंदुराव आवळे, सह-निर्माती ज्योती सरदार आवळे, कार्यकारी निर्माता राहुल नानासाहेब मोरे असून दिग्दर्शनाची धुरा सचिन तुकाराम वार्के यांनी सांभाळली आहे. कथालेखन हिरालाल कृष्णा कुरणे यांचे असून पटकथा, संवाद, सह-दिग्दर्शन, गीत व नृत्यदिग्दर्शन नंदापुत्र शैलेश राजन शिंदे यांनी केले आहे.
या भव्य अनावरण सोहळ्याला छायाचित्रकार अभिषेक शेटे, संगीतकार ऐश्वर्या मालगावे, संकलन शेखर गुरव, पार्श्वसंगीत शशांक पोवार, सहाय्यक दिग्दर्शक दादु संकपाळ, दीपक खटवकर, पुनःध्वनी मुद्रण राधाई डिजिटल रेकॉर्डिंग स्टुडिओ, डी.आय. निलेश पोटे, व्हीएफएक्स संदीप कांबळे, वेशभूषा अमृता खांडेकर, रंगभूषा महेश जाधव, शशी यादव, सदानंद सूर्यवंशी, निर्मिती व्यवस्थापक समीर मालदार, दादा पाटील, संजय पटवर्धन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
चित्रपटात विजय पाटकर, शुभांगी गोखले, प्रतीक आवळे, अनुराधा धामणे, संजय मोहिते, बालकृष्ण शिंदे, देवेंद्र चौगुले, उमेश बोलंके, सुवर्णे काले, आदित्य संतोष कसबे, अयुब इंग्लिकर, ओम वेसनेकर, तुषार कुडलकर यांची प्रभावी भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटाबाबत बोलताना निर्मिती व्यवस्थापक डेव्हिड लोखंडे म्हणाले, प्रलय हा एक वेगळा आणि हृदयाला भिडणारा सिनेमा आहे. सहकुटुंब सर्वांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा. 31 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात याचे प्रदर्शन होत असून प्रेक्षकांना निश्चितच एक नवा अनुभव मिळणार आहे. कोल्हापूर येथे झालेल्या ट्रेलर अनावरण सोहळ्यामुळे आता “प्रलय” चित्रपटाबद्दल महाराष्ट्र भरात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Post a Comment
0 Comments