मुरूड / राजीव नेवासेकर :- आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकांचे आरक्षण जाहीर झाले असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असल्याचे दिसून येत असून या निवडणुकीच्या तोंडावर मुरुडमध्ये खासदार धैर्यशील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहात एक बैठक घेण्यात आली.
सुरुवातीला माजी तालुकाध्यक्ष महेंद्र चौलकर यांनी उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात आली. या बैठकीत आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणूका डोळ्यासमोर ठेवून बहुमताने निवडून येण्याच्या दृष्टीकोनातून महत्वपूर्ण विचार विनिमय करण्यात आला. यावेळी खासदार धैर्यशील पाटील, दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष आलाप मेहता, महेश मोहिते, आस्वाद पाटील, ज्येष्ठ नेते जनार्दन सदाशिव तथा आण्णा कंधारे आदींनी आपले विचार मांडले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगड सरचिटणीस महेश मोहिते, आस्वाद पाटील, दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष आलाप मेहता, शैलेश काते, महेंद्र चौलकर, प्रवीण बैकर, महेश मानकर, बाळा भगत सुधीर पाटील, रमेश दिवेकर, धर्माजी हिरवे, उमेश माळी यांसह शहरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व महिला वर्ग आवर्जून उपस्थित होता.
Post a Comment
0 Comments