वसई / नरेंद्र एच. पाटील :- समाजसेवक परेश किणी याच्या वाढदिवसानिमित्त किणी फाउंडेशन आणि श्री गणेश मित्र मंडळ, निर्मळ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रियांदर्शनी नर्सिंग एनएबीएच (NABH) मान्यता प्राप्त जोशुआ मेमोरियल हॉस्पिटल प्राईवेट लिमिटेड व आय केअर हॉस्पिटल्स यांच्या सहकार्याने सर्वसामान्यांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार, १९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत गणपती मंदिर, निर्मळ, नालासोपारा (प.) येथे आयोजित करण्यात आले आहे.
शिबिरामध्ये विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत आरोग्य तपासण्या करण्यात येणार असून, सर्वसामान्य नागरिकांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे. शिबिरात वैद्यकीय तज्ज्ञांकडून रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा, थकवा अशा आजारांसाठी तपासणी व सल्ला दिला जाणार आहे. तसेच डोळ्यांची तपासणी, चष्म्याचा नंबर, डोळ्यांचे विकार, महिलांसाठी स्त्रीरोग तपासणी, हाडांचे विकार, दातांची तपासणी आणि तोंड, गर्भाशय, स्तन व इतर कॅन्सरची प्राथमिक तपासणीही करण्यात येईल.
या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे डॉक्टर सल्ला, औषधे, चष्म्यांचे वाटप, नेत्र तपासणी आणि कॅन्सर तपासणी याशिवाय रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन, बीएमआई (BMI) व वजन तपासणी अशा सर्व तपासण्या मोफत करण्यात येणार आहे. कॅन्सरच्या प्राथमिक स्क्रिनिंगची मोफत सुविधा ही या शिबिराची खासियत ठरणार आहे.
या शिबिरासाठी नालासोपारा मेडिकल असोसिएशनचे विशेष सहकार्य लाभले असून, हा उपक्रम परेश किणी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम खर्या अर्थाने प्रेरणादायी आहे. या शिबिराबद्दल अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी ९९२३२८४२४६ / ७५०७९८२१७१ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments