Type Here to Get Search Results !

कै. पंडित लोटन कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

* सहवास नसला तरी स्मृती सुगंध देत राहतील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील…” सहकारी, शिक्षकवर्ग आणि ट्रस्टकडून विनम्र आदरांजली

नगरदेवळा / प्रतिनिधी :- शिक्षक व सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्यामुळे सर्वांच्या मनात स्थान निर्माण करणारे कै. पंडित लोटन कुमार यांचे निधन झाल्याची बातमी समजताच परिसरात शोककळा पसरली. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ “पवार अँड हिस्टॉरिकल ट्रस्ट, नगरदेवळा” तसेच सर्व सहकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


कै. पंडित लोटन कुमार हे आपल्या मनमिळावू स्वभाव, कार्यतत्परता आणि प्रामाणिकपणामुळे सर्वांच्या मनात कायम आदराचे स्थान निर्माण करून गेले. त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या संवेदनशील आणि मृदू स्वभावाचा अनुभव घेतला होता. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान, विद्यार्थ्यांप्रती असलेली जिव्हाळ्याची भावना आणि संस्थेच्या विकासासाठी त्यांनी घेतलेली मेहनत यामुळे ते सर्वांच्या प्रिय झाले होते.


“आता सहवास नसला तरी स्मृती सुगंध देत राहतील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील...” या भावस्पर्शी शब्दांत सर्व सहकारी शिक्षक, कर्मचारी आणि संस्था परिवाराने त्यांना विनम्र अभिवादन केले.


Post a Comment

0 Comments