Type Here to Get Search Results !

बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचे निवेदन आनंदराज आंबेडकरांच्या वतीने म्हाडा अधिकाऱ्यांना सादर

मुंबई / रामदास धो. गमरे :- बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पग्रस्त कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ विश्वरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू बौद्धजन पंचायत समितीचे सभापती, सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली म्हाडा ऑफिसला धडकले.


या प्रसंगी सरसेनानी आनंदराज आंबेडकरांनी शिष्टमंडळासह म्हाडाचे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्वसन मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर व म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर या अधिकाऱ्यांची भेट घेऊन रहिवाश्यांच्या समस्या, अडचणी व त्यावर करता येणाऱ्या संभाव्य उपाययोजना यावर सविस्तर चर्चा केली. त्याअंतर्गत आनंदराज आंबेडकरांनी प्रत्येक घरामागे नवीन व जुनी (ए व बी) या चाळींसाठी पाठीमागे पार्किंग असायला हवी ही प्रथम मागणी धरून ठेवली, त्यावर विचार करून मागे पार्किंग इमारत उभी करण्याच आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर जुने घरभाडे हे अल्परकमी असल्याने ते घरभाडे ३० ते ४० हजारापर्यंत वाढवून देण्याची दुसरी मागणी आनंदराज आंबेडकरांनी जोर लावून धरून ठेवली. अधिकाऱ्यांनी सदर मागणीला आपल्या स्तरावर होकार दिला, परंतु या मागणीचा प्रस्ताव आम्ही पुढे महाराष्ट्र शासनाकडे पाठवू व स्वतः जातीने जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर सविस्तर प्रस्ताव मांडून जो काही निर्णय येईल त्यानुसार अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्वासन दिले.


सदर शिष्टमंडळात सरसेनानी आनंदराज आंबेडकरांसोबत युवानेते व मुंबई जिल्हाध्यक्ष सुनील जाधव, गट प्रतिनीधी संदेश खैरे, दीपक मोरे, जिनदास जाधव, काळे आणि इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते. आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सदर शिष्टमंडळाने म्हाडा अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक अशी चर्चा करून लवकरच पुढील निर्णयांची अंमलबजावणी होईल असे चित्र दिसत असल्याने बीडीडी चाळीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments