Type Here to Get Search Results !

भाग्य आमचे आदिवासी क्रांतिवीर नाग्या कातकरी व बिरसा मुंडा यांच्या वंशजांना विजयी करण्याचे - सुधीर ठोंबरे

* चौक जिल्हा परिषदेत अनुसूचित जमातीचे आरक्षण - आदिवासी समाजाच्या विकासासाठी नवी दिशा!

* हा देवाचा कौल आहे, आम्ही समाजासाठी झटणारच - भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे 

खालापूर / दिपक जगताप :-  चौक जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघात या वर्षी अनुसूचित जमाती आरक्षण लागू झाल्याने स्थानिक राजकारणात नवा अध्याय सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे यांनी सांगितले की, हा आरक्षणाचा निर्णय हा देवाचा कौल आहे. आदिवासी क्रांतिवीर नाग्या कातकरी आणि बिरसा मुंडा यांच्या वंशजांना विजयी करण्यासाठी आमचा प्रत्येक श्वास झटणार आहे.


जिल्हा परिषद गटातील जागा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्याने सुधीर ठोंबरे व त्यांचे बंधू मोतीराम ठोंबरे नाराज न होता याला समाजसेवेची नवी संधी म्हणून स्वीकारत आहेत. त्यांचा कायमचा ध्यास असतो की, “80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण" होय. ठोंबरे बंधू हे केवळ राजकीय नेते नाहीत, तर आदिवासी बांधवांच्या सुखदुःखात कायम सहभागी असलेले कार्यकर्ते आहेत. वाडी-वस्त्यांवर विकासकामे, पिण्याचे पाणी, रस्ते, शाळा आदी प्रत्येक प्रश्न त्यांनी स्वतःचा समजून सोडवला आहे.


आरक्षण जरी अनुसूचित जमातीसाठी पडले असले, तरी ते देवाचा संकेत मानून ठोंबरे बंधू आता अधिक जोमाने कामाला लागले आहेत. सुधीर ठोंबरे यांनी स्पष्ट सांगितले की, आम्ही निराश नाही. आमचे उद्दिष्ट केवळ पद नव्हे, तर समाजाचे भले आहे. या आरक्षणातून आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींना स्थान मिळेल आणि त्यात आमचा हातभार असेल, हीच आमची खरी कमाई आहे.


सुधीर ठोंबरे आणि मोतीराम ठोंबरे यांनी आदिवासी समाजात शिक्षण, पाणीपुरवठा, रोजगार आणि सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या पुढील पिढीत चौक ग्रामपंचायतीच्या सरपंच रितू ठोंबरे या महिलांना विकासाचे नवे उदाहरण घालून देत आहेत. आम्ही कुणाचे नुकसान बघून आनंदी होत नाही, पण आमचे गाव, आमचा समाज पुढे गेला की आनंद होतो, असे मत ठोंबरे कुटुंबाने व्यक्त केले आहे.


सुधीर ठोंबरे यांनी जाहीरपणे सांगितले की, या मतदारसंघात भाजपचा जो उमेदवार असेल, तो आमचाच माणूस आहे. आम्ही त्याला आपले समजून निवडून आणू. कारण आमचे ध्येय एकच आहे की, आदिवासी समाजाच्या वतीने विजय मिळवून विकासाचा नवा टप्पा गाठणे, होय.


त्यांनी पुढे म्हटले की,  हा केवळ राजकीय प्रश्न नाही, तर आदिवासी क्रांतिवीर नाग्या कातकरी आणि बिरसा मुंडा यांच्या संघर्षाचा सन्मान आहे. ठोंबरे बंधूंच्या सेवाभावी वृत्तीमुळे त्यांना सर्व समाजघटकांत आदर आहे. त्यांच्या कार्यातून केवळ आदिवासी समाजच नाही, तर सर्वसामान्य ग्रामीण जनतेलाही लाभ झाला आहे.

Post a Comment

0 Comments