* विद्यार्थ्यांनी सादर केले उत्कृष्ट मॉडेल ; शैक्षणिक गुणवत्ता व स्वच्छतेचे प्राचार्य काटकर यांच्याकडून कौतुक
नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- नगरदेवळा (ता. पाचोरा) येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेला सोमवारी सरपंच पती तथा सरदार एस. के. पवार विद्यालयाचे प्राचार्य किरण काटकर यांनी विशेष भेट देत शाळेची शैक्षणिक गुणवत्ता, इमारत परिसराची स्वच्छता व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यांची पाहणी केली. शाळेची प्रगती आणि प्रसिद्धी प्रत्यक्ष पाहण्यासाठी त्यांनी हा दौरा आयोजित केला होता.
* विद्यार्थ्यांकडून मॉडेल सादरीकरण :- शाळेला भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्या समोर तयार केलेली शैक्षणिक मॉडेल्स सादर करण्याचे आवाहन प्राचार्य काटकर यांनी केले. विद्यार्थ्यांनी विज्ञान, समाजशास्त्र, पर्यावरण आदी विषयांवरील आकर्षक मॉडेल्स सादर करून उपस्थित मान्यवरांची प्रशंसा मिळवली.
* ग्रामपंचायत सदस्यांची उपस्थिती :- या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य वसीम शेख, माजी सदस्य अन्सार शेख तसेच शाळेतील शिक्षक वर्ग उपस्थित होता.
* शैक्षणिक गुणवत्ता व स्वच्छतेचे कौतुक :- प्राचार्य काटकर यांनी विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाचे कौतुक केले. शाळेचे परिसर स्वच्छता, नियमित शैक्षणिक उपक्रम व शिक्षकांची मेहनत यांची त्यांनी विशेष नोंद घेतली. ग्रामस्थ व पालकांच्या सहकार्यामुळे शाळा उत्तम दिशेने वाटचाल करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
* शाळेला प्रोत्साहन देण्याचे आश्वासन :- पाहणीदरम्यान सरपंच पती तथा सरदार एस. के. पवार विद्यालयाचे प्राचार्य किरण काटकर यांनी शाळेला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासह विद्यार्थ्यांच्या उपक्रमांना पुढील वेळी अधिक प्रोत्साहन देण्याचे आश्वासन दिले.

Post a Comment
0 Comments