Type Here to Get Search Results !

भरधाव वाहनाची धडक : पाचोरा रस्त्यावर काळवीट ठार

* भडगाव आयटीआयजवळची घटना - वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर 

भडगाव / प्रतिनिधी :- भडगाव शहरातून पाचोरा रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गांवर असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) जवळ 20 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडलेल्या अपघातात एका काळवीटाचा भरधाव अज्ञात वाहनाने केलेल्या धडकेत मृत्यू झाला. घटनास्थळीच काळवीट ठार झाल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये मोठी खंत व्यक्त होत आहे.


* घटना कशी घडली ? :- नियत वेळी आयटीआय परिसरातून एक काळवीट रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी पाचोरा दिशेने भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की काळवीटाचा जागीच मृत्यू झाला. वाहनचालक मात्र अपघातानंतर पसार झाला.


* वन विभागाची तातडीची कारवाई :- घटनेची माहिती मिळताच पाचोरा वनपरिक्षेत्र अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, वनपाल, वनरक्षक संदीप पाटील या पथकाने तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्यूची खात्री करून काळवीटाचा ताबा वन विभागाकडे सोपविला. 21 नोव्हेंबर रोजी सकाळी सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण करून काळवीटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


* वन्यप्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न कायमच गंभीर :- या घटनेमुळे जंगललगतच्या रस्त्यांवर वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. भरधाव वेग, रात्रीच्या वेळी वाहतुकीचा बेफिकीरपणा आणि जंगल क्षेत्रातील रस्त्यांवर सूचनाफलकांचा अभाव हे घटक वन्यजीवांसाठी घातक ठरत आहेत. वन विभागाने अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला असून अपघातातील वाहनचालकावर कठोर कारवाई करण्याची तयारी दाखवली आहे.


Post a Comment

0 Comments