* ‘माझी शाळा - सुंदर शाळा’ अभियानासाठी वाढदिवशीच दिले अर्थसहाय्य
* लहान वयात मोठी जाणीव - वृषभचा मनी बँक शाळेला अर्पण
* शताब्दी महोत्सवानिमित्त शाळा रंगकाम व सौंदर्यीकरणाला गती
शिंदेवाडी (ता. माळशिरस) / अनिल पवार :- गावातील ‘माझी शाळा - सुंदर शाळा’ उपक्रमाला गती देण्यासाठी शिंदेवाडीतील सुदर्शन सुभाष जैन यांचा चिरंजीव वृषभ जैन या चिमुकल्याने आपल्या वाढदिवसानिमित्त स्वतःचा मनी बँक (गल्ला) शाळेला अर्पण करीत समाजसेवेचे अनोखे उदाहरण घालून दिले आहे. वृषभने दिलेली ₹5,313/- ची रक्कम या उपक्रमाला अर्थपूर्ण मदत ठरली असून त्याच्या या संवेदनशील कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गावकऱ्यांनी आणि पालकांनी वृषभच्या या आदर्शातून प्रेरणा घेऊन शाळेच्या विकासकार्यात सहकार्य करावे, अशी विनंती शाळा व्यवस्थापन समितीकडून करण्यात आली आहे.
* शताब्दी वर्षानिमित्त नव्या रुपात शाळा :- शाळेच्या सौंदर्यीकरणासाठी उद्यापासून प्रत्यक्ष रंगकामाला सुरुवात होत आहे. मागील दोन दिवसांत आवश्यक किरकोळ दुरुस्तीचे काम पूर्ण करून इमारतीला रंगकामासाठी सज्ज करण्यात आले आहे. हिच शाळा जिथे आजोबा, वडील, आपण आणि आता मुले शिकत आहेत. गेल्या वर्षी या शाळेची शंभर वर्षांची परंपरा पूर्ण झाली असून शताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रमांची मालिका राबविण्यात येत आहे.
* आदर्श आणि परिपूर्ण विद्यालयाची निर्मिती :- मुख्यमंत्री उपक्रमाशी जोडून शाळेचे सौंदर्यीकरण, विद्यार्थी गुणवत्तावाढ, प्रशासकीय सुधारणा, पायाभूत सुविधा उभारणी यांच्या माध्यमातून शाळेला आदर्श स्वरूप देण्याचा संकल्प मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी केला आहे.
* शिंदेवाडी व पंचक्रोशीतील नागरिकांना सहकार्याचे आवाहन :- या उपक्रमासाठी शिंदेवाडी तसेच परिसरातील मान्यवर, समाजसेवक, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
* अर्थसहाय्यासाठी खाते माहिती :-
A/C No. - 151002840009443
IFSC Code - YESB0SDC001
वृषभ जैनसारख्या मुलांच्या संवेदनशील कृतीमुळे गावातील ‘सुंदर शाळा’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरते आहे. लहान वयातील मोठा संदेश - समाजासाठी काहीतरी देण्याची प्रेरणा देणारा आहे, असे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकवृंद यांनी सांगितले.

Post a Comment
0 Comments