* ग्रामपंचायतीकडून पायाभूत सुविधांना मोठी चालना
* सरपंच व सदस्यांच्या प्रयत्नांचे ग्रामस्थांकडून कौतुक
खालापूर / अर्जुन कदम :- रायगड जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या वासांबे - मोहपाडा ग्राम पंचायतीमध्ये विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. सुमारे 66 हजार लोकसंख्या असलेली ही ग्रामपंचायत विस्तीर्ण हद्द आणि मर्यादित निधी यामुळे अनेक वर्षांपासून विविध पायाभूत सुविधांच्या अपेक्षेत होती. ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण मागण्या आणि निवेदनांच्या पार्श्वभूमीवर अखेर ग्रामपंचायत कमिटीने विकासकामांना मोठी गती देत अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांना सुरुवात केली.
* सरपंच उमाताई मुंढे यांच्या हस्ते लोकार्पण :- ग्रामपंचायत वासांबे - मोहपाडा हद्दीत राबविण्यात येणाऱ्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण सरपंच उमाताई संदिप मुंढे, सदस्य रसिका राकेश खराडे, प्रतिक्षा रोशन राऊत आणि आकाश अमृत जुईंकर यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये विशेषत्वाने विजय म्हस्कर ते मनोज तांबोळी रस्ता, वैभव खराडे ते विनायक मुंडे रस्ता, अमित शहा ते अविनाश धुरव रस्ता या रस्त्यांचा समावेश आहे. ग्रामस्थांनी हे प्रश्न ग्रामसभेत मांडून तसेच दोन वर्षांपूर्वी लेखी निवेदन देऊन मागणी केली होती. अखेर या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत कामांचा शुभारंभ करण्यात आला.
* सांडपाणी गटार, सुशोभीकरणासह अंगणवाडी विकासकामांचा समावेश :- उद्घाटन करण्यात आलेल्या इतर महत्त्वाच्या कामांत मोहोपाडा मासळी बाजार ते सार्वजनिक शौचालयपर्यंत काॅक्रीट सांडपाणी गटार बांधकाम, भालचंद्र राऊत ते गणेश भोईर काॅक्रीट गटार प्रकल्प, श्री दत्त मंदिरासमोर ब्लाॅक बसवून बंदिस्त गटारनिर्मिती, मोहपाडा अंगणवाडीचे सुशोभिकरण तर ज्यांचे भूमिपूजन पार पडले अशा कामांत विजय म्हस्कर ते मनोज तांबोळी रस्ता काॅक्रीटीकरण, वैभव खराडे ते विनायक मुंडे रस्ता काॅक्रीटीकरण, अविनाश धुरव ते अमित शहा रस्ता काॅक्रीटीकरण, प्रविण गीध ते श्री दत्त मंदिर सांडपाणी गटार,रमेश भंडारकर ते मनोहर धोत्रे रस्ता बांधकाम यांचा समावेश आहे.
* ग्रामस्थांकडून सरपंच व सदस्यांचे मनापासून कौतुक :- ग्रामपंचायतीने मर्यादित निधी असूनही विकास कामांना गती दिल्याबद्दल ग्रामस्थांनी सरपंच व सदस्यांचे विशेष कौतुक केले. अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्ते - गटाराच्या मागण्या अखेर पूर्ण होत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमास माजी सरपंच संदिप मुंढे, माजी सरपंच रोशन राऊत, सामाजिक कार्यकर्ते राकेश खराडे, माजी सभापती रमेश पाटील, माजी सभापती सुरेश म्हात्रे, हेमंत चाळके, अजित सावंत आदींसह परिसरातील पदाधिकारी आणि शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
* विकासाला नवी दिशा - ग्रामपंचायतीचा संकल्प :- विकासकामांच्या शुभारंभादरम्यान सरपंच आणि सदस्यांनी पुढील काळात पायाभूत सुविधा, स्वच्छता, रस्ते आणि सार्वजनिक सोयीसुविधांमध्ये अधिक सुधारणा करण्याचा संकल्प व्यक्त केला.

Post a Comment
0 Comments