Type Here to Get Search Results !

यशवंत माणके लिखित, दिग्दर्शित “मुक्तांगण” नाटकाचा दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात प्रयोग

* वृद्धाश्रमातील हृदयस्पर्शी व्यथा रंगभूमीवर ; दुबळ्या आई–वडिलांची अंतःकरण हेलावणारी कहाणी

* मुंबईकरांसाठी तीन पिढ्या एकत्र पाहावे असे नाटक - 26 नोहेबर रात्री 8 वाजता विशेष प्रयोग

मुंबई / दिपक कारकर :- गुहागर तालुक्याचा अभिमान आणि अनेक वर्षे रंगभूमीची साधना करीत नाट्यक्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे नाटककार - नाट्यकलावंत यशवंत माणके यांनी लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले “मुक्तांगण” हे दुहेरी अंकाचे प्रभावी नाटक आज मुंबईत सादर होत आहे. 26 नोव्हेंबर 2025 (बुधवार) रात्री 8 वाजता मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले (पूर्व) येथे या नाटकाचा 8 वा भव्य प्रयोग सादर केला जाणार आहे.

* वृद्धाश्रमावर आधारित वास्तववादी कथा :- “मुक्तांगण” हे नाटक आई - बापाला वृद्धाश्रमात राहण्याची वेळ का येते, त्यामागची सामाजिक कारणे, भावनिक ताण आणि पालकांच्या डोळ्यांतील न बोलता येणाऱ्या वेदना यांना अत्यंत प्रभावी भाषेत मांडते. नाट्यविशारद, प्रेक्षक आणि समीक्षकांकडून या नाटकाचे टप्प्याटप्प्याने कौतुक होत आहे. नाटकाच्या माध्यमातून पालकांची काळजी, बदलती कौटुंबिक नाती आणि सामाजिक जाणिवा याबद्दल संवेदनशील संदेश दिला जातो.


* नाटक नव्हे, आई - बापाची वेदना पहा :- नाटककार यशवंत माणके म्हणतात की, हे नाटक फक्त मनोरंजन नाही ; हे दुबळ्या आई - बापाच्या मनातील वेदना पाहण्याची संधी आहे. तीन पिढ्यांनी एकत्र पहावे असे हे एकमेव नाटक आहे. वृद्धाश्रमातील अनुभवी कलाकारांनी साकारलेल्या भूमिकांमुळे नाटकातील वास्तव अधिकच जिवंत वाटते. मुंबईकरांसाठी “मुक्तांगण” चा हा प्रयोग भावनिक आणि विचारांना चालना देणारा अनुभव ठरणार आहे.


* प्रयोग पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा :- नाटक पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी उत्सुकता असून आयोजकांनी मोठ्या संख्येने या आणि कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले आहे.

तिकिटांसाठी संपर्क :- 

📞 रमेश भेकरे – 9594352863

📞 संजय वाघे – 9870380580

"मुक्तांगण” हा आजचा प्रयोग केवळ नाट्यरसिकांसाठीच नाही तर नातेसंबंध, पालकांचा सन्मान आणि मानवी मूल्यांची जाण ठेवणाऱ्यांसाठी आवर्जून पहावा असा आहे.

Post a Comment

0 Comments