* सारंग मित्र मंडळ (वालीव) तर्फे समाजसेवक राहुल घरत यांच्या नेतृत्वाखाली विशेष शुभेच्छा
* बहुजन विकास आघाडी कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती
विरार / नरेंद्र पाटील :- "प्रविणा हितेंद्र ठाकूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...शुभेच्छुक - सारंग मित्र मंडळ वालीव अध्यक्ष, समाजसेवक व बहुजन विकास आघाडी कार्यकर्ता राहुल आत्माराम घरत.."
विरार येथील श्री द्वारकाधीश मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्त आणि प्रविणा हितेंद्र ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा मोठा ओघ पाहायला मिळत आहे. सारंग मित्र मंडळ (वालीव) तर्फे समाजसेवक व अध्यक्ष राहुल आत्माराम घरत यांच्या नेतृत्वाखाली विशेष अभिनंदन संदेश देण्यात आला.
मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या आकर्षक शुभेच्छा बॅनरमुळे भक्त आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष वेधले. बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही ठाकूर कुटुंबीयांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
26 नोव्हेंबरच्या या विशेष दिवशी प्रविणा ठाकूर यांना मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा संदेश प्राप्त होत असून, मंदिर महोत्सव आणि वाढदिवसाचा दुहेरी सोहळा उत्साहात पार पडत आहे.

Post a Comment
0 Comments