* प्रभागनिहाय उमेदवार व चिन्हांची यादी जाहीर
* अपक्षांनीही सुरू केला प्रहागनिहाय जोरदार प्रचार
पाचोरा / फिरोज पिंजारी :- पाचोरा नगर परिषद निवडणूक 2025 साठी उमेदवारांची अधिकृत चिन्हवाटप प्रक्रिया पूर्ण झाली असून, यानंतर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे गट), भारतीय जनता पार्टी, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच अपक्ष उमेदवार अशा सर्व पक्षांनी आता प्रचारयुद्धाला जोरदार सुरुवात केली आहे.
नगराध्यक्षपदासाठी शिवसेना (शिंदे गट) च्या सुनिता किशोर पाटील विरुद्ध भाजपाच्या सुचेता दिलीप वाघ अशी थेट लढत होणार आहे. दोन्ही उमेदवार मागे दिग्गज नेत्यांचे राजकीय अस्तित्वपणाला लागले असून, यंदाची लढत 'प्रतिष्ठा विरुद्ध प्रतिष्ठा’ अशी पाहायला मिळणार आहे.
* मोठ्या नेत्यांच्या सभांना सुरूवात :- शिवसेना (शिंदे गट) च्या उमेदवारांना बळ देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पाचोऱ्यात प्रचारसभा घेणार आहेत. भाजपकडून गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) दोन्ही पक्षांकडून 'साम, दाम, दंड, भेद' या सर्व राजकीय शस्त्रांचा वापर होत असून वातावरण चुरशीचे झाले आहे.
* प्रभागनिहाय उमेदवार यादी :-
- नगराध्यक्ष :-
सुनिता किशोर पाटील - शिवसेना (धनुष्यबाण)
सुचेता दिलीप वाघ - भारतीय जनता पार्टी (कमळ)
- प्रभाग क्र 1 अ :-
कोमल अजय अहिरे - भारतीय जनता पार्टी (कमळ)
मनीषा सुचेंद्र बाविस्कर - शिवसेना (धनुष्यबाण)
मेघना रामकृष्ण सोनावणे - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (मशाल)
- प्रभाग क्र 1 ब :-
किशोर गुणवंत बारवकर - शिवसेना (धनुष्यबाण)
भुषण दिलीप वाघ - भारतीय जनता पार्टी (कमळ)
नवल रमेश मिस्तरी - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (मशाल)
- प्रभाग क्र 2 अ :-
गोहील संजय नाथालाल - शिवसेना (धनुष्यबाण)
बागूल अनंत विठ्ठल - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (मशाल)
विशाल तात्या बागुल - इंडियन नॅशनल काँग्रेस (पंजा)
ब्राम्हणे सुमेध जगदीश - भारतीय जनता पार्टी (कमळ)
वाघ प्रविण भिकन - अपक्ष (गॅस सिलेंडर)
- प्रभाग क्र. 2 ब :-
चौधरी मंगला विरेंद्र - भारतीय जनता पार्टी (कमळ)
चौधरी वैशाली छोटूलाल - शिवसेना (धनुष्यबाण)
फकिर शमीनाबी साबीर शहा - अपक्ष (ऑटो रिक्षा)
मन्यार नरगिस बी मन्यार शेख इरफान - इंडियन नॅशनल कॉंग्रेस (पंजा)
शेख आसमां बी जावेद - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (मशाल)
- प्रभाग क्र 3 अ :-
पाटील कविता विनोद - भारतीय जनता पार्टी (कमळ)
महाजन सुनंदाबाई मधुकर - शिवसेना (धनुष्यबाण)
- प्रभाग क्र 3 ब :-
चेडे सतीश पुंडलिक - शिवसेना (धनुष्यबाण)
पाटील प्रशांत रामदास - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (मशाल)
पाटील लक्ष्मण रघुनाथ - भारतीय जनता पार्टी (कमळ)
- प्रभाग क्र 4 अ :-
बागवान जेबून्निसा अय्यूब - भारतीय जनता पार्टी (कमळ)
बागवान मुजफ्फर शे. शकूर - अपक्ष (बॅट)
बागवान रफिक गफ्फार - शिवसेना (धनुष्यबाण)
बागवान हाजरा बी यासिन - राष्ट्रवादी कॉंग्रेस (घड्याळ)
- प्रभाग क्र 4 ब :-
खान आबेदाबी मो. जहुर - राष्ट्रवादी काँग्रेस (घड्याळ)
शेख रशिदा बी शब्बीर - शिवसेना (धनुष्यबाण)
सैय्यद परवीन सैय्यद दानीश - भारतीय जनता पार्टी (कमळ)
- प्रभाग क्र 5 अ :-
बागवान खनसा सलीम - शिवसेना (धनुष्यबाण)
बागवान शमिम बी शेख जाबीर - अपक्ष (ऑटो रिक्षा)
पिंजारी एराम खुराम - भारतीय जनता पार्टी (कमळ)
- प्रभाग क्र 5 ब :-
खान अजहर अय्युब - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (मशाल)
चौधरी संजय त्र्यंबक - शिवसेना (धनुष्यबाण)
माळी वासुदेव भिवसन - भारतीय जनता पार्टी (कमळ)
- प्रभाग क्र 6 अ :-
ठाकुर सुष्मा अमोल - भारतीय जनता पार्टी (कमळ)
तडवी रहेमान बिस्मील्ला - शिवसेना (धनुष्यबाण)
सोनवणे दिपक प्रकाश - अपक्ष (कपबशी)
- प्रभाग क्र 6 ब :-
चौधरी मनिषा धर्मेंद्र - भारतीय जनता पार्टी (कमळ)
सावंत प्रांजल सुमित - शिवसेना (धनुष्यबाण)
सावंत सुनिता अनिल - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (मशाल)
- प्रभाग क्र 7 अ :-
ब्राम्हणे वर्षा प्रवीण - शिवसेना (धनुष्यबाण)
भालेराव नम्रता प्रमोद - भारतीय जनता पार्टी (कमळ)
- प्रभाग क्र 7 ब :-
पिहाल विनोद महावीर - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (मशाल)
शिंदे सतीष परशुराम - भारतीय जनता पार्टी (कमळ)
ब्राम्हणे प्रवीण हरिश्चंद्र - शिवसेना (धनुष्यबाण)
- प्रभाग क्र 8 अ :-
एरंडे मीनाक्षी संजय - शिवसेना (धनुष्यबाण)
पाटील सरला संजय - भारतीय जनता पार्टी (कमळ)
- प्रभाग क्र 8 ब :-
पाटील गणेश भिमराव - शिवसेना (धनुष्यबाण)
पाटील निखील दिलीप - भारतीय जनता पार्टी (कमळ)
मोरे बंडू अशोक - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (मशाल)
- प्रभाग क्र 9 अ :-
भोसले सचिन मालोजीराव - भारतीय जनता पार्टी (कमळ)
पाटील सुमित किशोर - शिवसेना (धनुष्यबाण)
- प्रभाग क्र 9 ब :-
दीपाली किशोर पाटील - शिवसेना (धनुष्यबाण)
सोमवंशी प्रतिभा प्रवीण - भारतीय जनता पार्टी (कमळ)
- प्रभाग क्र 10 अ :-
पाटील योगेश जगन्नाथ - शिवसेना (धनुष्यबाण)
वाघ सूरज संजय - भारतीय जनता पार्टी (कमळ)
- प्रभाग क्र 10 ब :-
भोसले जयश्री अमृतराव - शिवसेना (धनुष्यबाण)
पाटील सिमा समाधान - भारतीय जनता पार्टी (कमळ)
- प्रभाग क्र 11 अ :-
देशमुख अमरीन अब्दुल रहेमान - भारतीय जनता पार्टी (कमळ)
पाटील मनिषा संदीप - शिवसेना (धनुष्यबाण)
- प्रभाग क्र 11 ब :-
गायकवाड राहुल अंकुश - अपक्ष (छत्री)
देशमुख अनिस आलम चांदपाशा - शिवसेना (धनुष्यबाण)
लिंगाडे विनोद अरुण - अपक्ष (कपबशी)
- प्रभाग क्र 12 अ :-
पाटील प्रियंका वाल्मीक - शिवसेना (धनुष्यबाण)
पाटील सरला ओमप्रकाश - भारतीय जनता पार्टी (कमळ)
बागवान रुक्सार इम्रान - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (मशाल)
- प्रभाग क्र 12 ब :-
जगताप वाल्मिक शालिग्राम - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (मशाल)
पाटील संदिप रामदास - शिवसेना (धनुष्यबाण)
सोनार स्वप्निल सुनिल - भारतीय जनता पार्टी (कमळ)
- प्रभाग क्र 13 अ :-
हटकर कविता उमेश - भारतीय जनता पार्टी (कमळ)
हाटकर मालती बापू - शिवसेना (धनुष्यबाण)
- प्रभाग क्र 13 ब :-
केसवाणी राम ग्यानचंद - शिवसेना (धनुष्यबाण)
दुंदुले श्रीकृष्ण विठ्ठल - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (मशाल)
वासवाणी गोपालदास अर्जुनदास - भारतीय जनता पार्टी (कमळ)
- प्रभाग क्र 14 अ :-
पाटील विकास संतोष - भारतीय जनता पार्टी (कमळ)
महाजन अविनाश राजाराम - अपक्ष (कपबशी)
वाघ प्रदीप भगवान - शिवसेना (धनुष्यबाण)
- प्रभाग क्र 14 ब :-
पाटील राजसबाई हिरामण - भारतीय जनता पार्टी (कमळ)
पाटील सुरेखा अशोक - शिवसेना (धनुष्यबाण)
प्रभागनिहाय यादीत शिवसेना (शिंदे गट), भाजप, शिवसेना (उद्धव गट), काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवारांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. प्रत्येक प्रभागात किमान 2 ते 5 उमेदवार रिंगणात असून, बहुतांश प्रभागांमध्ये त्रिकोणी व चौकोणी लढत दिसून येत आहे. यामध्ये काही ठिकाणी पती-पत्नी, वडील-मुलगा, भाऊ-बहिण अशी नाती ही राजकीय अखाड्यात उतरली आहेत.
* चार दिवसांत घराघरांत मतदारसंवाद :- मतदानाला आता फक्त पाच दिवसांचा अवधी शिल्लक राहिल्याने महापदाधिकाऱ्यांचे दौरे, प्रभागनिहाय पदयात्रा, महिलांशी संवाद, युवा मोर्चे, सोशल मीडिया प्रचार अशा सर्व माध्यमांचा तुफान वापर सुरू आहे.
* कोण सिद्ध करणार ताकद ? :- यंदाची निवडणूक पूर्णपणे आपल्या बाजूने झुकावी, यासाठी भाजपचा शक्तिप्रदर्शनावर जोर आहे. शिंदे गटामागे आमदार किशोर पाटील यांची ताकद लागली आहे. उद्धव गट सर्व प्रभागात अस्तित्व टिकवण्याच्या प्रयत्नात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला काही प्रभागांत चांगला प्रतिसाद मिळत असून अपक्ष उमेदवारही प्रचारात आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
* पाचोरात ऐतिहासिक लढत निश्चित :- पाचोरा नगर परिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार ? पुढील चार दिवसांत प्रचार किती जोरात होईल ? कोण ठरेल जनतेची निवड ? हे पाहणे आता अत्यंत रोचक ठरणार आहे…!

Post a Comment
0 Comments