Type Here to Get Search Results !

उद्योगातून उभा राहिलेला विकासाचा चेहरा : प्रणय ऊर्फ मुन्ना दिलीप भांडारकर यांची दमदार एन्ट्री

उद्योग, सामाजिक बांधिलकी आणि राजकीय क्षेत्रातील सक्रिय योगदानाची यशोगाथा

जच्या जागतिकीकरणाच्या आणि मुक्त बाजारपेठेच्या युगात संधींची दारे सर्वांसाठी खुली झाली आहेत. पण आजच्या स्पर्धात्मक आणि वेगवान युगात यश केवळ नशिबाने मिळत नाही, ते मिळते दूरदृष्टी, कष्ट आणि प्रामाणिकतेच्या बळावर. माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे व्यवसाय आणि प्रगतीसाठी नव्या वाटा निर्माण झाल्या आहेत. अशा बदलत्या काळात जिद्द, नियोजन आणि सकारात्मक विचारांच्या बळावर उद्योगविश्वात यश संपादन करीत राजकीय क्षेत्रातही प्रभावी पाऊल टाकणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रणय ऊर्फ मुन्ना दिलीप भांडारकर.

यशस्वी उद्योजक, समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व आणि आता विकासदृष्टी असलेला राजकीय चेहरा असा बहुआयामी प्रवास प्रणय भांडारकर यांचा आहे.

* विचारांची ताकद, उद्योगातील यश आणि शेतकऱ्यांशी नाळ :- “यश हे विचारांपासून सुरू होते” या तत्वावर विश्वास ठेवत 1976 पासून सुरू असलेली ‘अनुप कृषी सेवा’ आजही शेतकऱ्यांच्या विश्वासाचे केंद्र आहे. प्रत्यक्षात 1976 पासून सुरू असलेल्या या कुटुंबीय व्यवसायाला जवळपास पाच दशकांची परंपरा लाभलेली आहे. शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून, त्यांना योग्य मार्गदर्शन देत आणि गुणवत्तापूर्ण सेवा पुरवत भांडारकर कुटुंबाने जळगाव जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. व्यवसायाकडे केवळ नफ्याचे साधन म्हणून न पाहता समाजसेवेचे माध्यम म्हणून पाहण्याची त्यांची भूमिका हीच त्यांच्या यशाची खरी गुरुकिल्ली ठरली.

जाणीवपूर्वक नियोजन, विश्वासार्हता आणि गुणवत्तेचा आग्रह या त्रिसूत्रीवर उभा राहिलेला उद्योग आजही शेतकऱ्यांचा आधारवड आहे.


* सामाजिक जाणीव आणि राजकीय वाटचालीचा प्रारंभ :- उद्योगासोबतच सामाजिक कार्यातही मुन्ना भांडारकर सातत्याने सक्रिय राहिले. गरजूंसाठी मदत, युवकांशी संवाद, गावातील धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभाग या माध्यमातून त्यांनी समाजाशी घट्ट नाते जोडले. त्यांच्या साधेपणामुळे आणि निस्वार्थ वृत्तीमुळे त्यांना स्थानिक पातळीवर व्यापक पाठिंबा मिळाला. ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार दिलीप वाघ, भाजप नेत्या वैशालीताई सूर्यवंशी आणि युवा नेते अमोल शिंदे आदी मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भारतीय जनता पक्षात सक्रिय भूमिका स्विकारली. अलकाताई भांडारकर यांचा राजकीय वारसा लाभल्यामुळे त्यांच्यातील नेतृत्वगुण अधिक परिपक्व झाले.


* टक्केवारी नाही, फक्त विकास :- नगरदेवळा गावाच्या सद्यस्थितीकडे पाहून मुन्ना भांडारकर यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “विकासकामांमध्ये कोणतीही टक्केवारी स्विकारली जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ या तत्त्वावर ठाम राहून काम करू.” राजकीय हव्यासासाठी नव्हे, तर गाव आणि जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासासाठी निवडणूक लढत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.


* सर्वसमावेशक विकासाची ग्वाही :- 'सबका साथ, सबका विकास’ या भूमिकेवर विश्वास ठेवत त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावाच्या विकासाचा संकल्प केला आहे. त्यांच्या विकास आराखड्यात दमदार व दर्जेदार रस्ते, नदीवर मजबूत आणि सुरक्षित पूल, शेतीकडे जाणाऱ्या नदी-नाल्यांवरील गुणवत्तापूर्ण फरशी, तरुणांसाठी रोजगारनिर्मिती, प्रत्येक गावात मूलभूत सुविधा, पारदर्शक प्रशासन अशा ठोस कामांना प्राधान्य देण्याचा निर्धार आहे.


* युवकांच्या आशा-अपेक्षांचा केंद्रबिंदू :- नगरदेवळा, पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव तालुक्यातील युवकांमध्ये मुन्ना भांडारकर यांचे नाव विश्वासाने घेतले जाते. अल्पावधीतच ते युवकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. आर्थिकदृष्ट्या सक्षम, दूरदृष्टी असलेला आणि राजकीय हेवेदावे टाळणारा तरुण चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.


* विकासाची नवी दिशा, नेतृत्वाचा नवा चेहरा :- प्रणय ऊर्फ मुन्ना दिलीप भांडारकर यांची वाटचाल ही केवळ उद्योग किंवा राजकारणापुरती मर्यादित नाही. ती सकारात्मक विचार, प्रामाणिकपणा आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीवर उभी आहे. यशस्वी उद्योजक ते प्रभावी राजकारणी हा त्यांचा प्रवास आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.


नगरदेवळ्याच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज झालेला हा तरुण चेहरा आता केवळ आश्वासन देत नाही, तर कृतीतून परिवर्तन घडविण्याचा निर्धार करीत आहे. नगरदेवळ्याच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात मुन्ना भांडारकर यांच्या नेतृत्वाखाली होणार ? असा विश्वास गावाला वाटत आहे.

- फिरोज पिंजारी (मुख्य संपादक - दै. कोकण प्रदेश न्यूज & खान्देश प्लस न्यूज) 8454886853.

Post a Comment

0 Comments