Type Here to Get Search Results !

माजी महापौर नारायण मानकर यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

* बहुजन विकास आघाडी व कार्यकर्त्यांकडून मनःपूर्वक अभिनंदन ; सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त

वसई-विरार / नरेंद्र पाटील :- वसई-विरार महानगरपालिकेचे माजी महापौर तथा बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते नारायण मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

सामाजिक कार्यकर्ते राहुल आत्माराम घरत, दलविंदर सिंग, समीर यशवंत पाटील, समीर कडुळकर, प्रथमेश कैलास पाटील, पराग वसंत पाटील, संजय निशाद, विशाल विरारकर तसेच बहुजन विकास आघाडी, वालीव विभाग आणि सारंग मित्र मंडळ यांच्या वतीने नारायण मानकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.


नारायण मानकर यांनी महापौर पदाच्या कार्यकाळात वसई-विरार शहराच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले. नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने प्रयत्न करीत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विकासकामांना गती मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.


यावेळी शुभेच्छुकांनी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करीत, भविष्यातही समाजहिताच्या कार्यात ते अधिक जोमाने पुढाकार घेतील, असा विश्वास व्यक्त केला. नारायण मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरात उत्साहाचे वातावरण असून विविध ठिकाणी शुभेच्छा फलक लावण्यात आले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत कार्यकर्त्यांनी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.


🎂 हार्दिक वाढदिवसाच्या शुभेच्छा ! 🎂

वसई-विरार महानगरपालिकेचे माजी महापौर तथा बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते नारायण मानकर आपणांस वाढदिवसानिमित्त उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व यशस्वी भवितव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

 

आपले नेतृत्व, सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेची तळमळ आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहिली आहे. आपण असेच जनतेच्या सेवेत सदैव कार्यरत रहावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.


- शुभेच्छुक :-

राहुल आत्माराम घरत

दलविंदर सिंग

समीर यशवंत पाटील

समीर कडुळकर

प्रथमेश कैलास पाटील

पराग वसंत पाटील

संजय निशाद

विशाल विरारकर

तसेच बहुजन विकास आघाडी - वालीव विभाग

सारंग मित्र मंडळ.

Post a Comment

0 Comments