* नगरदेवळ्यात इफ्तार पार्ट्यांमधून सामाजिक सलोखा दृढ
* मुन्ना भाऊ भांडारकर फाउंडेशनचा पुढाकार ; विविध गावांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर नगरदेवळा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या विविध इफ्तार पार्ट्यांमधून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रेरणादायी दर्शन घडले. युवा नेते प्रणय ऊर्फ मुन्ना दिलीप भांडारकर यांच्या पुढाकारातून मुन्ना भाऊ भांडारकर फाउंडेशन, भारतीय जनता पार्टी, अनुप कृषी सेवा केंद्र यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.
नगरदेवळा येथील मणियार मोहल्ला (वार्ड क्रमांक 6), गरीब नवाज मस्जिद परिसर - लिडरपुरा (वार्ड क्रमांक 1), मदीना मस्जिद परिसर (वार्ड क्रमांक 3) तसेच आखतवाडे आणि नेरी या गावांमध्ये मोठ्या उत्साहात इफ्तार पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांना मुस्लिम बांधवांसोबतच इतर धर्मीय नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावून बंधुभावाचे उदाहरण घालून दिले.
* ‘सबका साथ, सबका विकास’चा संदेश प्रत्यक्षात :- या उपक्रमामागील प्रमुख उद्दिष्ट म्हणजे रमजान महिन्यात मुस्लिम समाजाला आनंदात सण साजरा करता यावा आणि ऐतिहासिक नगरदेवळा गावातील हिंदू-मुस्लिम ऐक्य अधिक बळकट व्हावे, हे होते. युवा नेते मुन्ना भांडारकर यांनी जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांना सोबत घेत विकास साधण्याचा निर्धार व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीष महाजन, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार दिलीप वाघ, वैशालीताई सुर्यवंशी, अमोल शिंदे यांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्वानुसार नगरदेवळा - बाळद जिल्हा परिषद गटात विकासाची गंगा आणण्याचे ध्येय त्यांनी व्यक्त केले.
* आखतवाडे - नेरी येथे ऐक्याचे प्रेरणादायी चित्र :- सोमवार, 16 मार्च (26 रमजान) रोजी आखतवाडे व गुरूवार, 19 मार्च (29 रमजान) रोजी नेरी येथे आयोजित इफ्तार पार्टीत विविध समाजातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. तसेच मुस्लिम बांधवांसोबत इतर धर्मीय नागरिकांनीही एकत्र येऊन इफ्तार केल्याने सामाजिक सलोखा अधिक दृढ झाल्याचे दिसून आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रमजानचे महत्त्व सांगत परस्पर आदर, सहिष्णुता आणि एकात्मतेचा संदेश दिला. “सर्व समाज एकत्र येऊन सण साजरे केल्यास समाजातील एकोपा अधिक मजबूत होतो,” असे मत व्यक्त करण्यात आले.
* मदीना मस्जिद परिसरात उत्साहात आयोजन :- बुधवार, 18 मार्च (28 रमजान) रोजी वार्ड क्रमांक 3 मधील मदीना मस्जिद परिसरातही इफ्तार पार्टी उत्साहात पार पडली. या कार्यक्रमात विविध धर्मीय नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमादरम्यान लहान-लहान बालकांचा मुन्ना भाऊ भांडारकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या प्रसंगामुळे कार्यक्रमाला भावनिक उंची लाभली.
* समाजातील सर्व घटकांचा सहभाग :- या सर्व कार्यक्रमांमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुस्लिम समाजातील तसेच हिंदू समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
* ईदनिमित्त शुभेच्छा, बंधुभाव अधिक दृढ :- रमजान ईदच्या दिवशीही मुन्ना भांडारकर यांनी ईदगाह मैदानावर जाऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची भेट घेऊन त्यांनी सणाचा आनंद द्विगुणित केला.
* सामाजिक एकात्मतेचा प्रभावी संदेश :- या इफ्तार पार्ट्यांमधून नगरदेवळा परिसरात सामाजिक एकात्मता, परस्पर विश्वास आणि बंधुभाव वाढविण्याचा प्रभावी संदेश देण्यात आला. विविध धर्मीय नागरिकांनी एकत्र येत सण साजरे केल्यामुळे गावातील ऐक्य अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व उपस्थित नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले.
युवा नेते प्रणय ऊर्फ मुन्ना दिलीप भांडारकर, माजी आमदार दिलीप भाऊ वाघ, वैशालीताई सुर्यवंशी, भूषण (सनी) दिलीप वाघ (माजी नगरसेवक, पाचोरा), प्राचार्य किरण काटकर (सरपंच पती, नगरदेवळा), जुबेर अली ताबीश (शायर), हजरत जमशेर मौलाना, अन्नू मेंबर, शेर खान, रज्जाक शेख, अफजल खान, आसिफ रजा खान, हबीब दादा, गनी शेठ, जिब्राईल शेख, अय्या मास्टर, उमर टेलर, एहतेश्याम शेख, निसार पहलवान, सलीम बागवान, अली रजा खान, अनीस शेख, इकबाल बागवान, महेबूब भाई, आरीफ खान, गनी टेलर, निसार शेख, महेबूब पिंजारी, दादामियां पिंजारी, लतीफ पिंजारी, मुन्ना काका परदेशी, विलास भामरे, कडू नाना पाटील, बंडू नाना काटकर, राजू महाजन, सुनील आप्पा राऊळ, इंद्रनील भामरे, अशोक सोन्नी, आदित्य परदेशी, मनीष डगवाले, उत्तम समारे, पिंटू तात्या सोन्नी, संजू बापू राऊळ, विलास सोनवणे, मनोज पाटील, हिलाल गायकवाड, सुनील कदम, अभिजीत पवार, अनिल पाटील, शकील बागवान, मुस्ताक खान, अरबाज खान, एतेशाम सर अली, मुख्तार शेख, अदनान रजा, अनिस खाटीक, सलीम शाह, जावेद शाह, शाकीर मणियार, मुख्तार मणियार, पत्रकार मिलिंद दुसाणे, प्रकाश जगताप, शैलेंद्र सोनार, फारूख शेख, हसीबूर शेख, पोलीस कर्मचारी हरीष दादा, दिनेश पाटील तसेच आखतवाडे येथील निजाम दादा, अकबर खान, चांद दादा, युनुस दादा, शौकत खान, फैयाज खान, कुतुबुद्दीन भाई, अलीम पहलवान, जाकीर दादा, अफरोज खान, सरफराज भाई, वसीम भाई, साहिल भाई, रेहान भाई, गुड्डू भाई, शागीर दादा, जमशेद दादा, सादिक शहा, अहमद दादा, बाप्पू दयाराम परदेशी, पत्रकार दिपक गढरी, जितू राजपूत सर, राहुल रामसिंग राजपूत, प्रकाश नामदेव परदेशी, परमेश्वर कैलास परदेशी, नयन दिलीप पाटील, राजेंद्र गणपत राजपूत, सागर डोंगर राजपूत, मंगल महादू गढरी, भूषण पाटील, दिपक पाटील व नेरी येथील मेहमूद याकूब पठान, शांतनू रामराव पाटील, भिवसन शंकर आहिरे, सागर भावराव आहिरे, रमजान शेखलाल, दिलावर शेख गुलाब, रज्जाक शेख रहमान, रऊफ याकूब पठान, रफीक करीम पठान, आदिलखान दलशेरखान पठान, सुनील बलिराम पाटील, लतीफ अब्बास पठान, हनीफ सरदार पठान, विजय दिनकर पाटील, गुलाब अय्यूब पठान, कलीम मजीद पठान, आधार रतन गढरी, शेरखान पठान, हबीब आमीन, अमीर अय्यूब पठान, शरद पाटील (सार्वे), किशोर पाटील (खाजोळा), राजू पाटील (वडगाव मुलाणे), रामधन परदेशी (दिघी), सुरेश अहिरे (बदरखे), रवि बाबा (पिंप्री), रावसाहेब पाटील (भोरटेक), सागर अहिरे (नेरी), संभाजी पाटील, बालू अण्णा (पिंप्री), भैय्या परदेशी (दिघी), विरेंद्र राजपूत (वडगांव) आदींनी सहभाग घेतला.

Post a Comment
0 Comments