* खासदार सुनील तटकरे यांचे आश्वासन
* वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत डंपिंग
खालापूर / साबीर शेख :- वासंबे ग्राम पंचायत ही एक हद्दीतील ग्रामस्थांसाठी अहोरात्र मेहनत करणारी गौरवशाली ग्राम पंचायत आहे. अशा ग्राम पंचायतीला सर्व प्रकारची शासकीय मदत करण्यास आनंद होतो, वासांबे मोहोपाडा ग्रुप ग्रामप़चायतीची लोकसंख्या 60 हजार पार झाल्याने लवकरच वासांबे मोहोपाडा नगर परिषद करण्यासाठी आमदार महेश बालदी आणि मी प्रयत्न करणार असल्याचे गौरवशाली उद्गार खासदार सुनील तटकरे यांनी मोहोपाडा ग्रामपंचायत कार्यालयात शनिवार, 3 मे रोजी काढले.
ग्रुप ग्रामपंचायत वासांबे यांनी सोलर दिवे आणि हायमॅक्स दिव्यांचे लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रम, दिव्यांग यांना घर घंटी वाटप, ग्राम पंचायत हद्दीतील नागरिकांना पिशव्या वाटप, ग्राम पंचायत स्थापनेपासून सरपंच पदाचा कारभार करणाऱ्या सरपंचांचा सत्कार कार्यक्रम खासदार सुनील तटकरे व आमदार महेश बालदी यांच्याहस्ते आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ग्राम पंचायतीने केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक करून ग्राम पंचायतीला मिळालेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आयएसओ (IOS) हे नामांकन प्राप्त झाले आहे, हे प्रमाणपत्र खासदार सुनील तटकरे यांनी सरपंच उमा मुंढे यांच्याकडे दिले.
आपल्या प्रास्ताविक भाषणात खासदार सुनील तटकरे व आमदार महेश बालदी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद व्यक्त करून ग्राम पंचायत यांनी केलेल्या विकासकामांचा आढावा घेताना माझी वसुंधरा अभियान अंतर्गत 5.0 मध्ये वासंबे ग्राम पंचायत कोकण विभागात प्रथम आल्याचे सांगितले. वासांबे ग्राम पंचायत व परिसर यांचा विकास करायचा असेल तर नगर परिषद होणे गरजेचे आहे, परिसरातील पाताळगंगा नदी 32 किमी असून पाण्यावर प्रक्रीया करुन पाईपलाईनव्दारे कंपन्यांचे सांडपाणी खाडीत सोडून त्यासाठी आपण पाठपुरावा करीत असून खासदार सुनील तटकरे यांनी सहकार्य करावे, असे आमदार महेश बालदी यांनी सांगून विकास कामांना लागणारे आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी माजी सरपंच संदीप मुंढे, माजी उपसरपंच सुरेश पाटील, कैलास म्हात्रे, ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील, उपसरपंच भुषण पारंगे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांच्यासह विविध स्तरांतील मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments