Type Here to Get Search Results !

छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठात महा जाॅब फेअर

* ६ व ७  मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज वि‌द्यापीठाच्या परिसरात होणार 

खालापूर / साबीर शेख :- छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ (CSMU) शेडूंग पनवेल यांच्या वतीने ६ आणि ७  मे २०२५ रोजी भव्य महा जॉब फेअर २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. हा दोन दिवसीय रोजगार मेळावा सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज वि‌द्यापीठाच्या परिसरात (शेडूंग) होणार आहे. या उपक्रमात ८९ नामवंत कंपन्या सहभागी होणार असून त्या ६,००० हून अधिक रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड करतील. आत्तापर्यंत १०,००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉं. प्रा. केसरीलाल वर्मा यांनी दिली.


संबंधित कंपन्या आयटी, अभियांत्रिकी, बँकिंग व वित्त, कॉमर्स व मॅनेजमेंट, आरोग्यसेवा व फार्मास्युटिकल्स, फॅशन डिझाईन, विधी, कला आणि मानवशास्त्र यांसारख्या विविध क्षेत्रांतील आहेत, त्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना अनेक उ‌द्योगांमध्ये करिअर करण्याची संधी मिळणार आहे. विद्यापीठाकडून करण्यात आलेल्या प्रमुख सुविधा मदत कक्षाची स्थापना, २४ तास अॅम्ब्युलन्स सेवा, प्राथमिक उपचार केंद्र, परवडणाऱ्या व सुलभ फूड स्टॉल्स, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. हा जॉब फेअर केवळ रोजगाराचा मंच नसून, तो उ‌द्योग जगत आणि शिक्षण संस्थांमधील सशक्त दुवा ठरेल आमचे उ‌द्दिष्ट वि‌द्यार्थ्यांना व्यावसायिक जगाशी जोडणे हे आहे, असेही त्यांनी सांगितले.


ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी नारायण खरजे यांनी प्रत्येक नोंदणीकृत वि‌द्यार्थ्याला त्याच्या क्षमतेनुसार योग्य करिअर संधी मिळावी, हे आमचे उ‌द्दिष्ट आहे. आम्ही सर्व तयारी पूर्ण केली आहे. अशी माहिती दिली.


जॉब फेअर अध्यक्ष प्रा. (डॉं.) प्रविण गुप्ता यांनी सांगितले, यंदाच्या रोजगार मेळाव्यात विद्यार्थ्यांचा आणि कंपन्यांचा उत्स्फूर्त सहभाग असल्याने हे आयोजन ऐतिहासिक ठरणार आहे. आम्ही सहभागींसाठी सुरक्षित, सोयीस्कर आणि उपयुक्त वातावरण निर्माण करीत आहोत. यावेळी इव्हेट चेअरमन डाॅं. प्रविण गुप्ता, एचओडी डाॅं. कल्पना दाभाडे, एचओडी डाॅं. अल्का पांडे, डाॅं. महेंद्र इंगले आदी उपस्थित होते.


सर्व नोंदणीकृत विद्यार्थी, पालक आणि उ‌द्योग क्षेत्रातील प्रतिनिधींना आवाहन करण्यात येते की त्यांनी या रोजगार मेळाव्यात सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यास हातभार लावावा व युवकांच्या उज्ज्वल भविष्यात मोलाचा वाटा उचलावा असे कुलगुरू डॉं. प्रा. केसरीलाल वर्मा यांनी केले.

Post a Comment

0 Comments