Type Here to Get Search Results !

सदाशिवनगर येथे उत्स्फूर्त रक्तदान शिबिर

* आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम 

माळशिरस / प्रतिनिधी :- भाजपाचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामपंचायत सदाशिवनगर, पुरदांवडे, येळीव, जाधववाडी व तामशिदवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन शिवामृत भवन सदाशिवनगर येथे करण्यात आले होते. रक्तदान शिबीराचे उद्घाटन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख हे उपस्थित होते.


शिबीराची सुरुवात सहकार महर्षी काकासाहेब व राजमाता अक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे भारतीय जनता पार्टीचे आमदार असून त्यांचे नेते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत व खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार आहेत व त्यांचे नेते शरदचंद्र पवार आहेत. दोन्ही नेत्यांचे पक्ष व नेते वेगवेगळे असून माळशिरस तालुक्यातील जनता सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्यापासून ते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व सध्याचे विद्यमान आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर मनापासून भरभरून प्रेम करीत आली आहे. मोहिते पाटील कुटुंबावर या माळशिरस तालुक्यातील लोकांचे प्रेम,श्रद्धा, व निष्ठा आहे. मोहिते पाटील कुटुंब सार्थ ठरविण्याचा अतोनात प्रयत्न करीत आहेत. आमदार व खासदार हे दोन्ही वेगवेगळ्या पक्षाचे असताना देखील पक्षीय राजकारणाला महत्व न देता मोहिते पाटील कुटुंबावर असणारी प्रेम व निष्ठा माळशिरस तालुक्यातील जनतेने सदर कार्यक्रमास उपस्थित राहून अधोरेखित केल्याचे दिसून आले.


आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशिल मोहिते पाटील यांनी आपला वाढदिवस हारतुरे, फेटे व डिजिटल पोस्टर न लावता सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्याचे आवाहन दोन्ही नेत्यांनी केले. त्यामध्ये रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून करावे, असे आवाहन केले होते. त्यांच्या आव्हानास प्रतिसाद देवुन मोहिते पाटील प्रेमी सदाशिवनगर, पुरदांवडे, जाधववाडी, येळीव व तामशिदवाडी येथील लोकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून रक्तदान केले.


यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी व विविध गावचे आजी-माजी सरपंच व सदस्य तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे माजी सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील ब्लड सेंटर अकलुज यांनी रक्त संकलन केले. रक्तदान शिबिरासाठी डॉं. संतोष खडतरे, डॉं. विजयसिंह भगत, डॉं. ज्ञानदेव ढोबळे, डॉं. अजित गांधी यांचे मोलाचे  सहकार्य लाभले.


Post a Comment

0 Comments