गेवराई / प्रतिनिधी :- बांधकाम व्यावसायिकांची देशपातळीवरील सर्वात प्रभावी संघटना असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (क्रेडाई) बीड जिल्हा उपाध्यक्षपदी गेवराई येथील युवा उद्योजक अमोल माळवे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. निवड झाल्याबद्दल अमोल माळवे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
कॉंन्फेडरेशन ऑंफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई) ही भारतातील रिअल इस्टेट विकासकांची (बिल्डर्स) सर्वोच्च संस्था आहे. सदरील संघटना रिअल इस्टेट उद्योगाच्या विकासासाठी आणि सदस्यांच्या हितासाठी काम करते. संघटीत रिअल इस्टेटला प्रोत्साहन देणे आणि शाश्वत विकासाला चालना देणे, या उद्दिष्टाने संघटना स्थापन झाली आहे. संघटनेच्या बाबतीत धोरनात्मक निर्णय घेणे, रिअल इस्टेट क्षेत्रातील नैतिक पद्धती सुनिश्चित करण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
क्रेडाईची बीड जिल्हा कार्यकारिणी २०२५ - २०२७ वर्षाकरीता निवडण्यात आली असून बीड जिल्हाध्यक्षपदी सुरेंद्र कासट तर सचिवपदी इंजि. संतोष सानप, सहसचिव इंजि. अमित वणवे, खजिनदार सुधीर अडाने, अध्यक्ष इलेक्ट इंजि. अक्षय घोडके, उपाध्यक्षपदी संजय आंबेगावे, उपाध्यक्ष शामीर सय्यद, उपाध्यक्ष इम्रान नाईक, संयोजक यूथ विग इंजि. प्रमोद घोडके, सह संयोजक यूथ विंग गौरव दुग्गड, समन्वयक वूमेनस विंग अन्विता काटकर, सह-समन्वयक वूमेनस विंग शितल घोडके, संयोजक प्रशासकीय समिती निहाल शेख, कलीम जहांगीर यांची निवड करण्यात आली आहे.
नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा, हॉटेल नीलकमल येथे उत्साहात पार पडला आहे. दरम्यान, युवा उद्योजक अमोल माळवे यांची उपाध्यक्षपदी निवड जाहीर होताच, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.
या निवडीचा कालावधी दोन वर्षाचा आहे. दरम्यान, संघटनेच्या माध्यमातून बीड जिल्ह्य़ातील उद्योजक, व्यापाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन, सर्वसमावेशक काम करण्यासाठी आपले प्राधान्य असेल, माझी निवड करून माझ्यावर विश्वास व्यक्त केल्याबद्दल संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Post a Comment
0 Comments