खालापूर / सुधीर देशमुख :- तांबाटी गावात ग्रुप ग्रामपंचायत तांबाटी सभाग्रुहात निरामय हेल्थ फाऊंडेशन आणि गोदरेज इंटरप्राइजेस ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्यसमृद्धी प्रकल्प अंतर्गत राष्ट्रीय पोषण माह उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणून आयरन युक्त रेसिपी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमास तांबटी ग्राम पंचायतचे सरपंच अविनाश आमले, गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपचे वरिष्ठ व्यवस्थापक सीएसआर (CSR) तानाजी चव्हाण, आयसीडीएस (ICDS) च्या सुपरवायझर अर्चना मॅडम, निरामय हेल्थ फाऊंडेशनच्या सिईओ (CEO) डॉं. क्षमा निकम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी या उपक्रमात 56 महिलांनी स्वतः बनविलेल्या आयरन युक्त पौष्टिक रेसिपी सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच आयसीडीएस (ICDS) अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनीही मोठ्या उत्साहाने कार्यक्रमात सहभाग घेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. राष्ट्रीय पोषण माहच्या निमित्ताने घेतलेल्या या उपक्रमाद्वारे महिलांमध्ये पोषणाविषयी जागरूकता निर्माण होऊन आरोग्यदायी आहाराचे महत्त्व अधोरेखित झाले. विजेता महिलांची पहिला क्रमांक मनाली संजय कुंभार, दुसरा क्रमांक भारती शुभम सकपाळ, तिसरा क्रमांक सुधा एकनाथ मालकर, प्रथम उत्तेजनार्थ जयश्री लहू महाराजे, द्वितीय उत्तेजनार्थ वर्षा गणेश तांडेल अशी आहेत.
तांबटी येथे राष्ट्रीय पोषण माह उत्साहात साजरा
September 21, 2025
0

Post a Comment
0 Comments