* भाजपने विलास राजाराम भामरे यांचे पुनर्वसन करावे!
* हृदय श्रीमंत, वचन पक्के - सेवा हीच राजकारणाची खरी ओळख ठरवणारा नेता पुन्हा मैदानात यावा, अशी जनतेची जोरदार मागणी!
नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- नगरदेवळा, वाघनगर, हसननगर, पोलिस लाईन आणि सरकारी दवाखाना परिसरात गेल्या काही दिवसांपासून एकच आवाज घुमतोय...“पिंटु भाऊंना संधी द्या!
माजी आमदार दिलीप वाघ समर्थक, विलास भामरे प्रेमी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, आणि विविध पक्षातील नागरिक या मागणीसाठी एकत्र आले आहेत. नगरदेवळा पंचायत समिती गणासाठी यंदा ओबीसी सर्वसाधारण आरक्षण पडले आहे, त्यामुळे यावेळी विलास भामरे यांना संधी मिळायला हवी, अशी मागणी गावात जोर धरत आहे.
विलास राजाराम भामरे यांचं राजकारण हे पैशावर नाही, तर लोकांच्या विश्वासावर उभं आहे. त्यांनी पाण्याची समस्या असो, रस्त्याचं काम असो, की नागरिकांच्या घरकुलाचा प्रश्न, प्रत्येक प्रश्न स्वतःचा समजून हाताळला. त्यांचा एकच मंत्र आहे की, सत्ता हे साधन आहे, पण सेवा हेच अंतिम लक्ष्य आहे. गावातील वृद्ध, शेतकरी, तरुण, महिला आदी सर्वांच्या मनात पिंटु भाऊंविषयी आदर आहे. म्हणूनच जनता आता “पुन्हा सेवक हवाय - सत्ताधारी नव्हे!” या भावनेने एकवटली आहे.
विलास भामरे हे भाजपच्या विचारांशी एकनिष्ठ असले तरी त्यांनी पक्षापेक्षा लोकांना प्राधान्य दिलं. अनेक वेळा त्यांनी स्वतःच्या पदापेक्षा जनतेच्या अडचणींना महत्त्व दिलं. त्यांच्या कारकिर्दीत नगरदेवळ्यातील अनेक प्रश्न मार्गी लागले. त्यांनी “भाजप कार्यकर्ता” म्हणून नव्हे, तर “जनतेचा प्रतिनिधी” म्हणून काम केले. म्हणूनच गावात आज चर्चा सुरू आहे, भाजपने जर खरंच लोकाभिमुखतेचा विचार केला, तर विलास भामरे यांचे पुनर्वसन अटळ आहे.
गावातील तरुणाई, शेतकरी वर्ग, महिला बचतगट, आणि वृद्ध नागरिक सर्वांचं एकच मत “पिंटु भाऊ" पुन्हा मैदानात उतरावेत...त्यांच्या कार्यकाळात गावात झालेला विकास, मिळालेलं प्रतिनिधित्व आणि लोकांसोबत निर्माण झालेलं आपलेपण आजही ताजं आहे. भामरे यांच्या संवादशैलीनं आणि उपलब्धतेनं जनतेला विश्वास दिला की, आपला माणूस सत्तेत असला की फरक पडतो!
नगरदेवळा पंचायत समिती गण हा या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा गण ठरत आहे. या गणात विलास भामरे यांच्या नावाभोवतीच चर्चा फिरते आहे. त्यांचं नाव घेतलं की लोक म्हणतात “तो बोलतो कमी, पण काम जास्त करतो!” त्यांनी कधी प्रचारासाठी गाजावाजा केला नाही, पण लोकांच्या मनातली जागा कधी सोडली नाही.
पिंटु भाऊंच्या कार्यशैलीबद्दल बोलताना गावातील एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले की, भामरे सत्तेत असो वा नसो, तो प्रत्येकाचे ऐकतो. आमचे गावचे मूल आहे. त्याला पुन्हा संधी मिळालीच पाहिजे. हेच लोकांचे मन आहे, हेच मतदान पेटीत उमटणारे वास्तव ठरेल.
विलास भामरे हे केवळ नगरदेवळ्याचे नव्हे, तर आसपासच्या गावांतील जनतेचेही आधार आहेत. त्यांना पुन्हा संधी देण्याची मागणी आता केवळ भावना नाही, तर लोकशाहीतील खऱ्या नेतृत्वाची मागणी बनली आहे. नगरदेवळ्यासारख्या गावांत आजही जनता नेत्याला “देवता” मानत नाही, तर “सेवक” म्हणून अपेक्षा ठेवते. भामरे यांचे व्यक्तिमत्त्व त्याच अपेक्षांचे उत्तर आहे. भाजपला जर “माणुसकी, सेवा आणि संघटन” या मूल्यांशी प्रामाणिक राहायचे असेल, तर अशा लोकाभिमुख नेत्यांचे पुनर्वसन करावे, हीच वेळेची गरज आहे.
Post a Comment
0 Comments