* शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कर्जत तालुक्यात संघटन बळकट करण्यासाठी पाऊल
कर्जत / नरेश जाधव :- आगामी कर्जत नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कर्जत तालुक्यात संघटन मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून परशुराम लोबो यांची दहिवली संजयनगर शाखा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन नंदकुमार सावंत यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले आहे.
ही नियुक्ती हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, रायगड जिल्हा प्रमुख मनोहर भोईर, तालुकाप्रमुख उत्तम कांबळे आणि कर्जत शहर प्रमुख निलेश घरत यांच्या सल्ल्यानुसार करण्यात आली आहे.
दहिवली संजयनगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व जनसेवेच्या कार्यात सक्रिय असलेले परशुराम लोबो हे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. स्थानिक जनतेच्या समस्या, विकासकामे आणि सामाजिक प्रश्नांवर त्यांनी सदैव आवाज उठविला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच त्यांना शाखा प्रमुखपदी नियुक्ती देण्यात आली असून या पदावरून ते शिवसेनेचे धोरण आणि विचारसरणी जनतेपर्यंत पोहोचवतील, असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केला आहे.
नियुक्ती पत्र देताना उपजिल्हाप्रमुख नितीन नंदकुमार सावंत म्हणाले की, परशुराम लोबो हे निष्ठावंत, कार्यतत्पर आणि जनसंपर्क असलेले कार्यकर्ते आहेत. त्यांच्याकडून दहिवली संजयनगर शाखेचे संघटन आणखी बळकट होईल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा!
Post a Comment
0 Comments