Type Here to Get Search Results !

वाढदिवसानिमित्त ग्रामस्थांची दादांना हाक ‘आता पंचायत समितीत या!

* गुरसाळे पंचायत समिती गणातील शिंदेवाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा एकमुखी आग्रह

* समाजकारणातून नेतृत्वाचा नवा अध्याय घडविणाऱ्या लतेश (दादा) शिंदे यांच्या उमेदवारीची मागणी जोर धरते


माळशिरस / अनिल पवार :-  गुरसाळे पंचायत समिती गणातील शिंदेवाडी आणि पंचक्रोशी परिसरात सध्या एकच चर्चा रंगली आहे की, “दादांनी आता पंचायत समितीत यावं! कारण, लतेश (दादा) शिंदे यांचा वाढदिवस ग्रामस्थांनी साजरा करताना त्यांच्याकडे राजकीय नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारण्याची मागणी एकमुखाने केली.


शिंदेवाडी तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी वाढदिवसानिमित्त एकत्र येऊन दादांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात ग्रामस्थ, युवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी एकमुखाने भावना व्यक्त केली की,  लतेश दादा हे आमचे खरे ग्रामनेते आहेत. त्यांनी यावेळी पंचायत समिती निवडणूक लढवावी. ग्रामस्थांच्या या मागणीमुळे पंचक्रोशीतील राजकीय वातावरणात नवा उत्साह आणि चैतन्याचे वारे वाहू लागले आहेत.


लतेश (दादा) शिंदे यांनी गेल्या काही वर्षांत समाजकारण, लोकसंपर्क आणि विकास या तिन्ही क्षेत्रांत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ते ग्रामस्थांच्या छोट्या-मोठ्या अडचणी स्वतःच्या जबाबदारीने हाताळणारे, युवकांना प्रोत्साहन देणारे आणि सामाजिक कार्यासाठी तत्पर राहणारे नेते म्हणून ओळखले जातात. ग्रामस्थ म्हणतात की, दादा हे केवळ नावापुरते नेते नाहीत, तर प्रत्येकाच्या दुःखात सामील होणारे, सामान्य माणसासाठी २४ तास उपलब्ध राहणारे खरे लोकनेते आहेत.


शिंदेवाडी परिसरात गेल्या काही वर्षांत अनेक विकासकामे लतेश शिंदे यांच्या पुढाकारातून पार पडली आहेत. त्यात रस्ते दुरुस्ती व नवीन रस्त्यांची उभारणी, पाणीपुरवठा सुधारणा योजना, अतिक्रमण मुक्ती उपक्रम, शिक्षण क्षेत्रात मदत आणि शैक्षणिक साधनांची उभारणी, वैद्यकीय मदत आणि आरोग्य शिबिरे, युवकांसाठी रोजगार आणि क्रीडा प्रोत्साहन उपक्रम, यांचा समावेश आहे. या कार्यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास, आपुलकी आणि नेतृत्वाची नवी भावना निर्माण झाली आहे.


वाढदिवसाच्या कार्यक्रमात ग्रामस्थांनी स्पष्टपणे मत व्यक्त केले की, दादा हे आमच्यासाठी नेहमी उपलब्ध असतात. त्यांनी ग्रामविकासाचे काम नेहमी प्रामाणिकपणे केले आहे. म्हणूनच या वेळी त्यांनी पंचायत समिती निवडणुकीत उतरून ग्रामविकासाला नवी दिशा द्यावी. त्यांच्या नेतृत्वाखाली गाव आणि पंचक्रोशीचा विकास वेगाने होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.


लतेश (दादा) शिंदे यांच्यावरील जनतेचा वाढता विश्वास पाहता, पंचक्रोशीतील राजकीय समीकरणात बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यांच्या उमेदवारीच्या चर्चेने स्थानिक राजकारणात उत्सुकता निर्माण केली आहे. राजकीय जाणकारांच्या मते, लतेश दादांनी निवडणूक लढवली, तर ती एकतर्फी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्या लोकप्रियतेचा आणि जनसंपर्काचा लाभ पंचायत समिती गणातील समीकरणांवर नक्कीच पडणार असल्याचे सर्वत्र मानले जात आहे.


लतेश (दादा) शिंदे हे केवळ राजकीय व्यक्तिमत्व नाहीत, तर ग्रामस्थांच्या भाषेत ते आहेत ‘आपले दादा’...प्रत्येकाच्या घरातील, हाकेला धावून येणारे नेते. त्यांची कार्यशैली नम्र, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख आहे. त्यामुळेच दादांनी आता पंचायत समितीत यावे ही मागणी ही केवळ निवडणुकीची हाक नाही, तर ग्रामस्थांच्या विश्वासाची घोषणा आहे.

Post a Comment

0 Comments