* राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उत्तर महाराष्ट्रातील युवती आघाडीच्या अध्यक्षा अभिलाषा भिला रोकडे यांची झंझावाती एन्ट्री...पंचायत समिती गणाच्या निवडणुकीत ‘किंगमेकर’ ठरण्याची चर्चा!
नगरदेवळा / प्रतिनिधी :- राजकारणात तग धरायचा म्हणजे संघर्ष, संयम आणि समाजाशी असलेला घट्ट संवाद यांचा उत्तम संगम लागतो. हे समीकरण जर एखाद्या युवती नेत्यात असेल, तर तिचे नाव आहे अभिलाषा भिला रोकडे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या युवती आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्षा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तरुण नेत्या आता नगरदेवळा पंचायत समिती गणाच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.
नगरदेवळा पंचायत समिती गणासाठी आरक्षण जाहीर होताच स्थानिक राजकारणात हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर अभिलाषा रोकडे यांनी आपल्या निर्धारपूर्ण भाषणातून स्पष्ट संदेश दिला आहे की, मी सज्ज आहे नगरदेवळा पंचायत समिती गणात विकासाची गंगा आणायला! हा लढा माझा नाही, तुमचा आहे. उमेदवार मी नव्हे, तुम्ही आहात. आपल्या गावाच्या आणि आपल्या मुलांच्या भविष्याकरिता एकत्र येऊ या. त्यांचा हा संवाद केवळ निवडणुकीचा नारा नाही, तर जनतेच्या सहभागातून विकास साधण्याचा ध्यास आहे.
अभिलाषा रोकडे यांचे राजकीय अस्तित्व हे संघर्षातून घडलेले आहे. कै. भिला रोकडे सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी राजकारणाचा मार्ग स्विकारला. अल्पावधीतच त्यांनी गोरगरीब, महिला आणि युवकांसाठी धावणारी नेत्री म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली. जळगाव जिल्हा, नगरदेवळा आणि पाचोरा तालुक्यातील राजकीय वर्तुळात त्यांचा सन्मानाने उल्लेख “धडाडीची, लोकाभिमुख युवती नेत्या” असा केला जातो. त्यांनी सामाजिक न्याय, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास या विषयांवर सातत्याने काम केले असून, त्यांच्या नेतृत्वात अनेक महिलांना स्वतःचा आवाज मिळाला आहे.
नगरदेवळा पंचायत समिती गणाच्या निवडणुकीत अभिलाषा रोकडे यांचे नाव पुढे आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. महिलांच्या नेतृत्वाला नवे बळ मिळण्याची ही संधी असल्याची भावना पक्षात दिसून येत आहे. त्या केवळ युवती आघाडीच्या अध्यक्षा नसून, महिलांच्या नेतृत्वाचा आत्मविश्वास आणि परिवर्तनाची ओळख बनल्या आहेत. त्यांच्या उपस्थितीने स्थानिक महिला आणि तरुणाईमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले आहे.
अभिलाषा रोकडे यांनी आपल्या निवडणूक आराखड्यात स्पष्ट सांगितले आहे की, गाव बदलायचं असेल, तर मनोवृत्ती बदलावी लागेल. मी केवळ विकासाचे आश्वासन देत नाही, तर पारदर्शक आणि जबाबदार कारभाराचं आश्वासन देते. त्यांच्या विकास आराखड्यात शेतीतील आधुनिकतेला चालना, महिलांसाठी स्वयंरोजगार योजना, शिक्षण आणि आरोग्य सेवांचा उन्नतीकरण, ग्रामविकासात पारदर्शकता आणि जबाबदारी यांचा समावेश आहे. त्यांचा भर आहे “लोकांच्या सहभागातून लोकांसाठी विकास” या तत्त्वावर आधारीत आहे.
अभिलाषा रोकडे यांनी आपल्या निवेदनात नागरिकांना भावनिक आवाहन केले आहे की, आपल्या गावाच्या विकासासाठी आपल्या मुलीच्या पाठीशी उभे रहा. हा लढा माझा नाही, तर प्रत्येक सामान्य नागरिकाचा आहे. हा संदेश केवळ भावनिक नाही, तर तो लोकशाहीतील स्त्रीशक्तीच्या सहभागाचा नवा अध्याय उघडतो. त्यांच्या सभांमध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि तरुणाईचा जोश हे या नेतृत्वाचं यश अधोरेखित करतात.
* “किंगमेकर” ठरण्याची शक्यता :- नगरदेवळा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिलाषा रोकडे या निवडणूक लढवतील किंवा नाही, हा गौण प्रश्न ठरला आहे. स्थानिक तसेच पाचोरा तालुका, जळगाव जिल्हा आणि राज्यातील अनेक वरिष्ठ नेत्यांचे लक्ष सध्या त्यांच्याकडे आहे. राजकीय निरीक्षकांचे मत आहे की, अभिलाषा रोकडे या उमेदवार म्हणून समोर आल्या नाहीत तरी, त्या या निवडणुकीत ‘किंगमेकर’ ठरतील. त्यांच्या पाठिंब्याशिवाय नगरदेवळा गणात कोणाचीही समीकरणे जुळणार नाहीत. त्यांच्या नेतृत्वाने पक्षांतर्गत समन्वय वाढवला असून, विरोधकांच्या गोटातही अस्वस्थता निर्माण झाली आहे.
* नव्या पिढीचा आत्मविश्वास, स्त्रीशक्तीचा आवाज :- अभिलाषा रोकडे यांचे व्यक्तिमत्व हे “राजकारणातील नवा विचार आणि नवी दिशा” दर्शवते. त्या पारंपरिक राजकारणाच्या चौकटी मोडून संवाद, सहकार्य आणि संवेदनशीलतेच्या माध्यमातून नेतृत्व करीत आहेत. त्यांच्या भाषणात आणि कृतीत दोन्ही ठिकाणी आत्मविश्वास झळकतो आणि म्हणूनच त्या केवळ उमेदवार नसून नव्या युगातील आशेचा चेहरा ठरल्या आहेत.
नगरदेवळा पंचायत समिती गणातील निवडणूक केवळ एक राजकीय लढाई राहिलेली नाही. ती स्त्रीशक्ती, युवा नेतृत्व आणि विकासदृष्टीच्या संगमाची कथा बनली आहे. अभिलाषा रोकडे यांचे नाव या निवडणुकीत फक्त चर्चेपुरते मर्यादित न राहता, त्या नगरदेवळा, पाचोरा आणि जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातील प्रभावी चेहरा आणि संभाव्य “किंगमेकर” म्हणून उदयास आल्या आहेत.
Post a Comment
0 Comments