* राष्ट्रीय जनसंपर्क प्रतिनिधी मंदा पवार यांच्या उपस्थितीत विक्रम गायकवाड, दिपक निकम, मोहन सौदागर व रिपब्लिकन पार्टीचे नेते अनिल गांगुर्डे यांच्या हस्ते सत्कार - पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
नाशिक / प्रतिनिधी :- दै. कोकण प्रदेश न्यूजचे मुख्य संपादक तथा न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी यांचे नुकतेच नाशिक पुण्यनगरीत आगमन झाले. त्यांच्या आगमनानिमित्त भूमी किसान जनता पार्टीच्या वतीने एका स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या स्वागत समारंभात भूमी किसान जनता पार्टीच्या राष्ट्रीय जनसंपर्क प्रतिनिधी मंदा पवार, सांस्कृतिक मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष विक्रम गायकवाड, महाराष्ट्र राज्याध्यक्ष दिपक निकम, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष मोहन सौदागर, तसेच नाशिक जिल्हा रिपब्लिकन पार्टीचे नेते तथा भिमटोला संघटनेचे अध्यक्ष अनिल गांगुर्डे यांच्या हस्ते पत्रकार फिरोज पिंजारी यांचा सत्कार करण्यात आला.
पुणे येथे KPM Media and Tech LLP तर्फे आयोजित भारत उद्योगरत्न पुरस्कार 2025 सोहळ्यात 'नटरंग' फेम प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते पत्रकारितेच्या क्षेत्रात सातत्याने आणि निडरपणे काम करीत सामाजिक प्रश्न, जनतेचा आवाज आणि सत्याचा शोध जपणाऱ्या पत्रकार फिरोज पिंजारी यांना प्रतिष्ठेचा “Lifetime Achievement in Journalism Award 2025” प्रदान करण्यात आला आहे. या अनुषंगाने हा भूमी किसान जनता पार्टीच्या वतीने पत्रकार फिरोज पिंजारी यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी पत्रकार पिंजारी यांच्या पत्रकारितेतील योगदानाचे कौतुक करीत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी पत्रकार पिंजारी यांनीही सर्व मान्यवरांचे आभार मानत सामाजिक भान ठेवून निर्भीड पत्रकारिता करण्याचा आपला संकल्प पुनः अधोरेखित केला. याप्रसंगी पिंजारी यांच्याकडे भूमी किसान जनता पार्टीच्या प्रसिद्धी व प्रचाराची जबाबदारी देण्यात आली.
नाशिक नगरीत झालेल्या या स्वागत सोहळ्याने पत्रकारिता क्षेत्रातील ऐक्य आणि आदराचे एक सुंदर उदाहरण घालून दिले आहे.
Post a Comment
0 Comments