* मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश सुपूर्द
* राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत भडगावचे माजी तालुकाध्यक्ष हर्षल पाटील यांचा उपक्रम
* उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे धनादेश सुपूर्द
मुंबई / फिरोज पिंजारी :- राज्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे करीत भडगावचे माजी तालुकाध्यक्ष हर्षल पाटील यांच्या ‘कृष्णा फाउंडेशन’ तर्फे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये (₹1,11,111/-) इतका धनादेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. ही देणगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यस्तरीय आढावा बैठकीदरम्यान देण्यात आली असून, शेतकऱ्यांच्या वेदनांशी एकात्मता व्यक्त करण्याचा हा उपक्रम ठरला आहे.
* शेतकऱ्यांच्या संकटात खंबीर साथ - कृष्णा फाउंडेशनचा प्रेरणादायी उपक्रम :- मागील काही आठवड्यांपासून राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, धरणातून सोडलेले पाणी आणि नद्यांच्या पुरामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील शेती वाहून गेली आहे. शेतकऱ्यांचे पीक, जनावरांचे चारा, घरे आणि साधनसामग्री यांचे मोठे नुकसान झाले आहे.
या परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज भासू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर हर्षल पाटील यांनी कृष्णा फाउंडेशनच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी देत समाजासमोर एक संवेदनशील आदर्श ठेवला आहे. त्यांचा संदेश स्पष्ट आहे की, राजकारणापेक्षा माणुसकी मोठी. शेतकऱ्यांचा संसार उभा राहण्यासाठी आपण सर्वांनी पुढे यावे.
* अजितदादांकडे धनादेश सुपूर्द :- या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते हा धनादेश स्विकारण्यात आला. कार्यक्रमावेळी राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री आमदार अनिल पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार, जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, युवक अध्यक्ष विकी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या सर्वांच्या साक्षीने मदतीचा धनादेश स्विकारला गेला आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती व्यक्त करण्यात आली. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येणारा प्रत्येक हात हा महाराष्ट्राच्या मातीचा सन्मान आहे. हर्षल पाटील यांचा हा उपक्रम केवळ देणगीपुरता मर्यादित नसून तो “संवेदनशील राजकारणाचा नवा चेहरा” म्हणून लक्षात राहील.
Post a Comment
0 Comments