* सप्तशृंगी कलेक्शनतर्फे दिपावली निमित्त भव्य प्रदर्शन व विक्री मेळावा
रेवदंडा / ओमकार नागावकर :- दिपावलीच्या आगमनानिमित्त सप्तशृंगी कलेक्शन आयोजित “दिपावली उत्सव भव्य प्रदर्शन व विक्री” कार्यक्रम उत्साहात पार पडला. भंडारी हॉल, मोठे बंदर, रेवदंडा येथे झालेल्या या उपक्रमात गृहउपयोगी वस्तू, दिवाळी सजावट, कलाकुसरीच्या वस्तू, इमिटेशन ज्वेलरी, खाद्यपदार्थ आणि विविध आकर्षक वस्तूंची विक्री करण्यात आली.
महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने स्थानिक महिलांना व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन नम्रता कारेकर आणि रोहन कारेकर (सप्तशृंगी कलेक्शन) यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटन सुरेखा घोडके यांच्या हस्ते फित कापून तर दीपप्रज्वलन आणि गणेश पूजन सरपंच प्रफुल मोरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी सुहास घोणे, रेवदंडा पोलिस म्हशेलकर, सुरेश खोत, निलेश खोत, भारती मोरे, सविता वाडकर, साधना म्हात्रे, अमृता कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अंजली वाणी, चित्रा वर्तक आणि शैलजा गोंधळी यांच्या मौल्यवान खारीच्या वाट्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाला ऊर्जा आणि दिशा लाभली. महिलांच्या हस्तकौशल्याला प्रोत्साहन, स्थानिक उद्योगांना चालना आणि उत्सवी वातावरणात आर्थिक स्वावलंबनाचा सुंदर संगम या प्रदर्शनातून पाहायला मिळाला.
Post a Comment
0 Comments